Womens Health: मासिकपाळीपूर्वी स्तनांमध्ये का होतात वेदना? 'हे' आहे खरं कारण. मासिक पाळीच्या काळात महिलांना अनेक त्रासाला सामोरं जावं लागतं. अनेक महिलांना मासिक पाळीत शरीराच्या प्रत्येक भागात वेदना होतात, तर अनेक महिलांना फक्त पोटदुखी किंवा पाठदुखीचा त्रास होतो.
अनेक महिलांना मासिक पाळीपूर्वी किंवा दरम्यान स्तनांमध्ये वेदना होण्याची समस्याही जाणवते.
स्तनाच्या दुखण्याबरोबरच, एखाद्याला सूज देखील जाणवू लागते. पण मासिक पाळीच्या आधी स्तनात वेदना का होतात?
मासिक पाळीपूर्वी स्तन दुखणे याला वैद्यकीय भाषेत cyclical mastalgia असं म्हटलं जातं.
या स्थितीमुळे मासिक पाळी येण्यापूर्वी स्तनांना सुज येते आणि सुजतात किंवा अनकंफर्टेबल वाटू लागतं.
तुमच्या शरीरातील हार्मोनल बदलांमुळे स्तनांमध्ये वेदना होणं आणि सूज येण्याची समस्या उद्भवते.
मासिक पाळी दरम्यान, इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन नावाचे दोन प्रजनन हार्मोन्स बदलतात.
मासिक पाळीच्या 1-2 आठवड्यांपूर्वी एस्ट्रोजेन हार्मोन वाढू लागतो, ज्यामुळे स्तनांना सूज येण्याची समस्या वाढते. तसंच प्रोजेस्टेरॉन वाढल्याने स्तनातील मिल्क ग्रँडला सूज येऊ लागते.