PHOTOS

8मार्च हा दिवस 'जागतिक महिला दिन' म्हणून का साजरा करतात? वाचा सविस्तर

8मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो मात्र हाच दिवस महिला दिन म्हणून का साजरा केला जातो ते जाणून घेऊयात. 

Advertisement
1/6

स्त्रियांचे मूलभूत हक्क नाकारणं आणि त्याकरीता महिलांनी केलेला संघर्ष याला अमेरिका आणि इतर देशही अपवाद नव्हते. 

 

2/6

भारताला पुरुषप्रधान देश म्हणून ओळखलं जात होतं मात्र अप्रत्यक्षरीत्या अनेक देश हे महिलांना दुय्यम वागणूक देत होते. 

 

3/6

प्रगत राष्ट्र म्हणून ओळखले जाणारे अमेरीका आणि युरोपीयन देशातही महिलांना आदर आणि सन्मान दिला जात नव्हता. आपल्या  अस्तित्त्वासाठी आणि आपल्यावर होणाऱ्या अन्यायावर वाचा फोडण्यासाठी या महिलांनी एकत्र येत संघर्ष केला. 

 

4/6

1908 मध्ये न्यूयॉर्कमध्ये 15 हजार महिलांनी कामाचा मिळणारा मोबदला हा पुरुषांना मिळणाऱ्या वेतनाइतकाच असावा. त्याचबरोबर मतदान करण्याचा  महिलांना ही समान हक्क मिळावा, या करीता रस्त्यावर उतरून आंदोलनं केली. 

5/6

जागतिक पातळीवर महिलांच्या या आंदोलनाची दखल घेण्यात आली. अखेर  1910 महिलांच्या हक्कांचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. त्यानंतर 1911 मध्ये डेनमार्क, जर्मनी आणि स्विझरलॅंडमध्ये 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्यात आला. 

6/6

त्यानंतर 1975 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी एकत्र येत, 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून अधिकृतपणे साजरा करण्यात आला.  

 





Read More