rried : तिथे मात्र संघातील एका खेळाडूच्या खासगी आयुष्यानं सर्वांच्याच नजरा वळवल्या आहेत. हा खेळाडू आहे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शा...
Shaheen Shah Afridi Getting Married : आशिया चषक स्पर्धेदरम्यानच पाकिस्ताचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याच्या लग्नाची बातमी आली आणि अनेकांच्याच भुवया उंचावल्या.
फेब्रुवारी 2023 मध्येच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी याच्या लेकिसोबत शाहीनचा निकाह पार पडला होता. त्यामुळं आता हा सात महिन्यांतच पुन्हा लग्न करतोय? असाच प्रश्न अनेकांना पडला.
आशिया चषक स्पर्धेनंतरच दोन दिवसांनी त्याचा हा निकाह पडणार आहे. पण, त्याची पत्नी दुसरीतिसरी कोणी नसून अनशाच आहे. ही तिच अनशा जिच्यासोबत शाहीननं फेब्रुवारीमध्ये निकाह केला होता.
राहिला प्रश्न ते पुन्हा लग्न का करतायत याबाबतचा तर, त्याचं उत्तरही इथंच आहे. फेब्रुवारी महिन्यात शाहीन आणि अनशा यांचा आफ्रिदी कुळाच्या रितीरिवाजांनुसार निकाह पार पडला होता.
फेब्रुवारीतील त्यांच्या विवाहसोहळ्याला फक्त कुटुंबीयांचीच हजेरी होती. ज्यामध्ये पाकिस्तानच्या क्रिकेट संघातील शाहीनचे काही मित्रही पाहायला मिळाले होते.
आता मात्र ही जोडी पुन्हा एकदा निकाह करत असून, यावेळी त्यांच्या आनंदात संपूर्ण मित्रपरिवार आणि कुटुंबीय सहभागी असणार आहेत. थोडक्यात त्यांचा दुसऱ्यांचा पार पडणारा निकाह अधिक मोठ्या आणि दिमाखदार स्वरुपात असेल.
19 सप्टेंबरला हा सोहळा पाकिस्तानातील कराची येथे पार पडणार आहे. ज्यामध्ये 21 सप्टेंबर रोजी इस्लामाबाद येथे लग्नाच्या निमित्तानं रिसेप्शनचंही आयोजन करण्यात आलं आहे.