PHOTOS

रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर 'X' चिन्ह का असते? रेल्वेने प्रवास करणाऱ्यांनाही माहिती नसेल उत्तर

भारताची जीवनरेखा म्हणून भारतीय रेल्वेला म्हटले जाते. दररोज रेल्वेने लाखो लोक प्रवास करतात. मात्र, अनेकांना माहिती नाही की रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर 'X' चिन्ह का असते?

Advertisement
1/8

देशभरात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करत असतात. याच रेल्वेला देशाची जीवनरेखा असं देखील म्हटलं जातं. 

2/8

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रेल्वे स्टेशन किंवा ट्रेनवर अनेक गोष्टी असतात. मात्र, लोक या गोष्टींबाबत कधीच विचार करत नाहीत. 

3/8

प्रवासी ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर 'X' चिन्ह का असते? याबद्दल तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? याचा अर्थ नेमका काय असतो? 

4/8

वास्तविक, प्रत्येक प्रवासी ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर म्हणजेच कोचवर 'X' लिहिणे हे अनिवार्य असते. हे X पिवळ्या रंगाचे असते. 

5/8

ज्या डब्याला X चिन्ह असते तो कोच हा सामान्य लोकांसाठी नसून तो रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी बनवलेला असतो. 

6/8

ज्या ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर X लिहिलेले असते तो त्या ट्रेनचा शेवटचा डब्बा असतो. याचा अर्थ रेल्वेचे सर्व डबे सुरक्षितपणे जोडलेले आहेत असा होतो. 

7/8

 'X' चिन्ह रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आणि प्रवाशांसाठी एक संकेत आहे की रेल्वेचा प्रवास पूर्णपणे सुरक्षित आहे. 

8/8

'X' चिन्हासोबत अनेकदा रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर 'LV' लिहिले असते. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी 'X' आणि 'LV' हे चिन्ह महत्त्वाचे आहेत. 





Read More