T20 World Cup 2024 Squad : अखेर टी-ट्वेंटी विश्वचषक 2024 साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केलीये.
विकेटकिपर म्हणून ऋषभ पंत आणि संजू सॅमसन या दोन विकेटकिपर फलंदाजांना संघात घेतल्याने केएल राहुलचा पत्ता कट झालाय, असं मानलं जातंय. मात्र, केएलला बाहेर का ठेवण्यात आलं? याची 5 प्रमुख कारणं पाहुया...!
केएल राहुल याची आयपीएलमध्ये चांगली कामगिरी राहिली नाही. आयपीएलमध्ये राहुलने 9 डावात 42 च्या सरासरीने 378 धावा केल्या. त्याचा स्कोर ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांच्यापेक्षा कमी राहिलाय.
केएल राहुल सध्या लखनऊच्या संघाकडून ओपनिंग करतोय. मात्र, टीम इंडियामध्ये सध्या ओपनिंगची जागा फुल्ल आहे. एकीकडे रोहित शर्मा आणि दुसरीकडे शुभमन आणि यशस्वी, त्यामुळे केएल राहुलचा पत्ता कट झाला.
केएल राहुलने जर चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर आयपीएलमध्ये फलंदाजी केली असती तर त्याला संधी मिळण्याची शक्यता होती. पंत आणि संजू मिडल ऑर्डरमध्ये खेळतात. त्यामुळे त्यांचा नंबर आधी लागला.
केएल राहुल आयपीएलमध्ये फिट दिसत नव्हता. दुखापतीतून बाहेर आल्यानंतर देखील केएल राहुलच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. तर दुसरीकडे ऋषभ सिलेक्शनच्या बाबतीत उजवा ठरला.
वर्ल्ड कपच्या मोठ्या सामन्यात केएल राहुल अपयशी ठरलाय. 2022 मध्ये राहुलने 6 डावात केवळ 128 धावा केल्या होत्या आणि स्ट्राईक रेट फक्त 120 होता. त्यामुळे त्याचं नाव पंत आणि संजूच्या मागे राहिलं.
T-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग , जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.