PHOTOS

वकील काळा तर डॉक्टर पांढराच कोट का घालतात? 99 टक्के लोकांना माहित नसेल उत्तर

Why Lawyers Wear Black And Doctors Wear White Coat : तुम्ही वकिलांना काळा कोट तर वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांना पांढरा कोट घातलेलं पाहिलं असेल. पण तुम्हाला यामागच कारण माहितीये का? या दोघांच्या कपड्यांमध्ये फक्त फॅशन परंपरा नाही तर एक गहन इतिहास सुद्धा लपला आहे. 

Advertisement
1/7

काळ्या रंगाला नेहमी गंभीरता, शक्ति आणि आदराचं प्रतीक मानलं जातं. म्हणून वकील त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात काळ्या रंगाचा कोट परिधान करतात. वकिलांनी काळा कोट घालणे ही परंपरा फार जुनी आहे. (फोटो क्रेडिट - Meta AI ) 

2/7

इतिहासात गेलं तर 17 व्या शतकात ब्रिटेनचा राजा चार्ल्स द्वितीयच्या मृत्यूनंतर वकिल आणि न्यायाधीशांनी काळ्या रंगाचे कोट घालण्यास सुरुवात केली. ही  त्यांची राजप्रती शोक व्यक्त करण्याची भावना होती, परंतू हळू हळू ही परंपरा बनत गेली आणि ती आज सुद्धा सुरु आहे. (फोटो क्रेडिट - Meta AI ) 

 

3/7

काळ्या रंगला न्याय, निष्पक्षता आणि गांभीर्यशी जोडला जातो. जेव्हा वकील काळ्या रंगाचा कोट घालून कोर्टात प्रवेश करतात तेव्हा त्यांच्याद्वारे हाती घेतलेल्या बाबींचे गांभीर्य आणि प्रामाणिकपणा यातून दिसून येतो. काळा रंग हा कठोर आणि शक्तिमान व्यक्तिमत्वाचं प्रतीक दर्शवणारा आहे. यातून वकिलांच्या कामाचे गांभीर्य दिसून येते. (फोटो क्रेडिट - Meta AI ) 

4/7

काळ्या रंगावर कोणताही डाग दिसत नाही, त्यामुळे वकील नेहमी परिपूर्ण दिसतात. हे एक प्रकारे त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रतिमा टिकवून ठेवण्यास मदत करते. (फोटो क्रेडिट - Meta AI ) 

5/7

डॉक्टर पांढरा कोट का घालतात याची कहाणी सुद्धा रोचक आहे. 19 व्या शतकाच्या मध्यात वैद्यकीय विज्ञानात वेगाने विकास झाला. हॉस्पिटलमध्ये स्वच्छत्यावर लक्ष दिले जाऊ लागले तेव्हापासून डॉक्टरांनी पांढऱ्या रंगाचा कोट घालण्यास सुरुवात केली. पांढऱ्या रंगावर डाग लवकर दिसून येतात, ज्यामुळे डॉक्टर स्वच्छतेप्रती जागरूक राहतात. (फोटो क्रेडिट - Meta AI ) 

 

6/7

पांढऱ्या रंगाचा कोट घालण्याचं दुसरं कारण आहे विश्वास. जेव्हा रुग्ण हा पांढऱ्या रंगाचे कपडे घातलेल्या डॉक्टरांना पाहतो तेव्हा त्याला विश्वास बसतो की ही व्यक्ती आपल्यावर योग्य उपचार करेल. पांढऱ्या रंगाचा प्रभाव एवढा गहन आहे की त्यामुळे रुग्णांना मानसिकदृष्ट्या शांत आणि सुरक्षित वाटते. (फोटो क्रेडिट - Meta AI ) 

7/7

पांढरा रंग हा आरोग्य आणि शुद्धतेचा प्रतीक आहे. हॉस्पिटल तसेच दवाखान्यांमध्ये स्वच्छता ठेवणं खूप महत्वाचं असतं. त्यामुळे पांढरा रंग हा डॉक्टरांना स्वच्छतेचं महत्व लक्षात आणून देतो. पांढरा कोट घातल्याने डॉक्टर व्यावसायिक आणि विश्वासार्ह दिसतात, ज्यामुळे रुग्णांचा विश्वास जिंकण्यास त्यांना मदत होते. (फोटो क्रेडिट - Meta AI ) 

 





Read More