Sunny Deol and Madhuri Dixit : 90 च्या दशकात धकधक गर्ल आणि अँगरी यंग मॅन सनी देओल यांचा त्रिदेवने एकच धुमाकूळ घातली. चाहत्यांना या दोघांची जोडी पसंत पडली पण तरीदेखील हे दोघे परत कधीच रुपेरी पडद्यावर दिसले नाहीत.
राजीव राय दिग्दर्शित 1989 साली रिलीज झालेल्या त्रिदेव या चित्रपटातून सनी आणि माधुरी एकत्र दिसले होते.
या चित्रपटातील गली गली में आणि तिरची टोपी वाले ही गाणी खूप गाजली होती. जॅकी श्रॉफ, नसीरुद्दीन शाह, सोनम आणि संगीता बिजलानी हे देखील या चित्रपटात होते.
प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला होता. 1990 मध्ये या चित्रपटाला 3 फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले होते.
असं असूनही माधुरी दीक्षित आणि सनी देओल पुढे कुठल्याही चित्रपटात दिसले नाहीत.
सनी देओल त्यांनतर अँग्री यंग मॅन म्हणून प्रेक्षकांना आवडला. तर माधुरी डान्स, रोमान्स, कॉमेडी आणि फॅमिली ड्रामा असलेल्या भूमिकेत प्रेक्षकांना आवडत होती.
त्यावेळी सनीसोबत अनिल कपूर आणि संजय दत्त देखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होते. प्रेक्षकांना माधुरीला अनिल कपूर आणि संजय दत्त सोबत अधिक पसंत करत होती.
त्यामुळे माधुरी दीक्षितला अनिल कपूर आणि संजय दत्त सोबत एकामागोमाग चित्रपटाच्या ऑफर येत होत्या.
या चित्रपटामुळे माधुरी दीक्षितला पुन्हा कधी सनी देओलसोबत काम करण्याची संधी मिळाली नाही. मात्र या दोघांची मैत्री आजही कायम आहे.