अनेक लोक दक्षिणेकडे तोंड करुन झोपतात. याचे अनेक वाईट परिणाम दिसून येत आहेत. या दिशेला पाय ठेवून झोपल्यास काय होते ते जाणून घ्या सविस्तर
शास्त्रात चार दिशांचे तपशीलवार वर्णन करण्यात आले आहे. त्यामधील नियमांचे पालन न केल्यास व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा आहे. या दिशेला पाय ठेवून झोपल्याने यमराज नाराज होतात. अशा परिस्थितीत तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
ज्योतिष शास्त्रानुसार, जर तुम्ही दक्षिणेकडे पाय करून झोपल्यास मंगल दोषाला सामोरे जावे लागते. त्यामुळे तुम्ही कर्जाच्या समस्येने त्रस्त होऊ शकता.
दक्षिणेकडे पाय ठेवून झोपल्याने तुम्हाला भीतीदायक स्वप्न पडू शकतात. त्यासोबतच तुम्हाला तणावाचा सामना करावा लागतो.
तसेच जे लोक दक्षिणेकडे पाय ठेवून झोपतात त्यांना पैशाची कमतरता भासते. या लोकांकडे पैसाही नसतो आणि कामात अपयशाचा सामना करावा लागतो.