PHOTOS

थंडीत फ्लॉवर पराठा का खाल्ला पाहिजे? जाणून घ्या याचे आरोग्यादायी फायदे

थंडीच्या दिवसामध्ये आहारात गरम आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे खूप गरजेचे असते. या ऋतूत फ्लॉवरपासून बनवलेला पराठा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. फ्लॉवरमध्ये असलेले पोषक घटक थंड हवामानात शरीराला उष्णता आणि ऊर्जा देतात. फ्लॉवर पराठा खाण्याचे आरोग्यासाठी कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया.  

Advertisement
1/10
1. पचनासाठी फायदेशीर
1. पचनासाठी फायदेशीर

फ्लॉवरमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे पचनसंस्था सुधारते. थंडीत अपचन किंवा पोटाच्या तक्रारी वाढतात, परंतु फ्लॉवर पराठा खाल्ल्यास पचनक्रिया सुरळीत राहते आणि पोट साफ होण्यास मदत होते.  

2/10
2. शरीराला उष्णता देते
2. शरीराला उष्णता देते

थंडीच्या काळात शरीराला गरम आणि उष्ण पदार्थांची गरज असते. फ्लॉवर पराठा शरीराला उष्णता देतो आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतो.  

 

3/10
3. वजन नियंत्रणात ठेवतो
3. वजन नियंत्रणात ठेवतो

फ्लॉवरमध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असते, त्यामुळे ते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. हा पराठा खाल्ल्यावर पोट भरल्यासारखे वाटते. ज्यामुळे अतिरिक्त खाण्याची सवय कमी होते.  

4/10
4. हृदयासाठी फायदेशीर
4.  हृदयासाठी फायदेशीर

फ्लॉवरमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन K भरपूर प्रमाणात असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. नियमित फ्लॉवर पराठा खाल्ल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि रक्ताभिसरण सुधारते.  

5/10
5. इम्युनिटी (रोगप्रतिकारशक्ती) वाढवतो
5. इम्युनिटी (रोगप्रतिकारशक्ती) वाढवतो

थंडीच्या हंगामात सर्दी, खोकला आणि इतर संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. फ्लॉवरमध्ये व्हिटॅमिन Cअसते. जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.  

 

6/10
6. हाडांना मजबूत बनवतो
6. हाडांना मजबूत बनवतो

फ्लॉवरमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते, जे हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक आहे. थंडीत सांधेदुखी किंवा हाडांच्या समस्या वाढतात. अशावेळी फ्लॉवर पराठा खाणे उपयुक्त ठरते.  

7/10
7. डायबिटीससाठी उपयुक्त
7. डायबिटीससाठी उपयुक्त

फ्लॉवरमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स (GI)असल्याने ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठी हा पराठा फायदेशीर आहे.  

8/10
8. त्वचेसाठी फायदेशीर
8. त्वचेसाठी फायदेशीर

फ्लॉवरमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेचे आरोग्य सुधारतात. थंडीत त्वचा कोरडी पडते, परंतु फ्लॉवर पराठा खाल्ल्यास त्वचेवर सकारात्मक परिणाम होतो आणि त्वचा उजळते.  

 

9/10
फ्लॉवर पराठा कसा बनवावा?
फ्लॉवर पराठा कसा बनवावा?

1. फ्लॉवर किसून त्यात मसाले म्हणजेचं जिरे, हळद, मिरपूड, मीठ , कोथिंबीर आणि लाल तिखट घालावे.   2. त्यानंतर गव्हाच्या पीठापासून कणिक मळून घ्यावी. कणिक चांगली मळल्यानंतर एक छोटा गोळा घ्यावा. त्यात फ्लॉवरचे सारण घालून गोलाकार लाटून घ्यावे. त्यानंतर तव्यावर तूप किंवा तेल लावून दोन्ही बाजूंनी खमंग भाजा.   3. गरमागरम पराठा दही किंवा लोण्यासोबत खा.  

10/10
थंडीत फ्लॉवर पराठा का खाल्ला पाहिजे?
थंडीत फ्लॉवर पराठा का खाल्ला पाहिजे?

फ्लॉवर पराठा पौष्टिक, चवदार आणि सहज पचणारा पदार्थ आहे. यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळते, शरीर थंडीत उष्ण राहते आणि तुम्हाला ताजेतवाने वाटते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत आहारात फ्लॉवर पराठा नक्की समाविष्ट करा आणि त्याचे आरोग्यदायी फायदे अनुभवा.

 





Read More