Mangalsutra Facts: सौभाग्याचं लेणं म्हणजे ंमणी मंगळसूत्र. प्रत्येक विवाहित स्त्री मंगळसूत्र परिधान करते. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की मंगळसूत्रात काळे मणी का असतात. त्यामागील कारण काय आहे?
विवाह झाला की महिला आपल्या गळ्यात मंगळसूत्र परिधान करतात. या मंगळसूत्राची खासियतही फार वेगळी असते.
परंतु तुम्ही कधी हा विचार केला आहे का की मंगळसूत्रात नेहमी काळे मणी का असतात. या काळ्या मण्यांचे नक्की महत्त्व आहे तरी काय?
हल्ली मंगळसूत्र हे विविध ढंगात आणि फॅशनमध्येही येतात. त्यामुळे बाजारहाट करायला गेलेल्या महिलांना अनेक पर्यायही मिळतात.
सध्या आपण या लेखातून जाणून घेणार आहोत की नक्की यामागे काय कारण आहे.
मंगळसूत्रात काळे मणी आणि सोनंही असते. असं म्हणतात की, काळ्या रंगानं नजरदोष दूर होतो. ज्योतिषशास्त्रानुसार, काळा रंग हा शनिदेवाचं प्रतीक आहे तर सोनं म्हणजे पिवळा रंग हे गुरू ग्रहाचं प्रतीक आहे.
शनी आणि गुरू मुळे तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद येतो.
सोनं हे माता पार्वती आणि काळे मणी हे शिवाचे प्रतीक आहे.
तुमच्या वैवाहिक जीवनाला कोणाची नजर न लागो यासाठी याचे महत्त्व विशेष आहे.