PHOTOS

टॉयलेट फ्लशला दोन बटण का असतात? 99 टक्के लोकं चुकीच्या पद्धतीने करतात वापर

> टॉयलेटचा वापर दिवसातून अनेकवेळा केला जातो. परंतू अनेकजणांना माहित नसते की टॉयलेटमधील घाण स्वच्छ करण्यासाठी ज्या टॉयलेट फ्लशचा वापर के...

Advertisement
1/7

ज्या टॉयलेट फ्लशला दोन बटण असतात त्यांना 'ड्यूल फ्लश सिस्टम' असे म्हणतात. ज्याला खास करून पाणी वाचवण्याच्या उद्देशाने बनवले गेले आहे. या फ्लशमधील दोन्ही बटणांचा वापर हा वेगवेगळा आहे.  

2/7

'ड्यूल फ्लश सिस्टम' मधील फ्लशच्या छोट्या बटणाचा उपयोग हा हाफ फ्लशसाठी केला जातो. ज्याचा उपयोग तुम्ही लघवी केल्यानंतर करू शकता. यात जवळपास 3 लिटर पाण्याचा वापर होतो.

 

3/7

'ड्यूल फ्लश सिस्टम' मधील फ्लशच्या मोठ्या बटणाचा उपयोग फुल फ्लशसाठी केला जातो. ज्याचा उपयोग हा मल त्याग केल्यावर करायला हवा. यात जवळपास 6 लिटर पाण्याचा वापर केला जातो. 

4/7

एका रिसर्चनुसार 90 टक्के लोकांना ड्यूल फ्लश सिस्टम मधील दोन बटणांमधील फरक माहित नसतो. ज्यामुळे ते प्रत्येकवेळी पूर्ण फ्लश करतात. ज्यामुळे एखादा व्यक्ती दररोज 10-15 लिटर पाणी वाया घालवतो. 

5/7

घरात चार सदस्य हे जर दिवसातून प्रत्येकी 5 वेळा शौचालयाचा वापर करत असतील तर प्रत्येक वेळी पूर्ण फ्लश केल्यास टॉयलेटमध्ये एकूण 120 लिटर पाणी खर्च होऊ शकते. तसेच जर ड्यूल फ्लश सिस्टमचा वापर योग्यपणे केला गेला तर पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते.

6/7

1980 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये ड्युअल फ्लश सिस्टमचा वापर करायला सुरुवात करण्यात आली होती. घरगुती स्तरावर पाण्याचा वापर कमी होणे हा त्याचा हेतू होता. आज ही व्यवस्था जगभरातील शौचालयात आहेत. 

7/7

टॉयलेटमधील ड्यूल फ्लश सिस्टमचा उपयोग हा योग्य प्रकारे करण्यात आला तर मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत केली जाऊ शकते. 

 





Read More