Why Virat Kohli Turned Vegetarian: विराट कोहलीने काही वर्षांपूर्वीच्या एका मुलाखतीमध्ये त्याला बटर चिकन फार आवडतं असं म्हटलं होतं. मात्र अचानक त्याने नॉन व्हेज फूड सोडलं. विराटने अचानक नॉन व्हेज फूड सोडण्यामागे एक विशेष कारण होतं. यासंदर्भात त्यानेच एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. नेमकं असं काय घडलं की विराटने नॉन व्हेज फूड सोडलं जाणून घेऊयात...
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यामध्ये भारताला दमदार कामगिरीची अपेक्षा असलेल्या खेळाडूंमध्ये विराट कोहलीचं नाव आघाडीवर आहे.
आयपीएलमधील जबरदस्त फॉर्म विराट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्येही कायम ठेवेल अशी आशा त्याच्या चाहत्यांना आहे.
विराटने सध्या 7 जूनपासून सुरु होणाऱ्या या सामन्याची इंग्लंडमधील नेट्समध्ये प्रॅक्टीस सुरु केली आहे.
प्रॅक्टीसबरोबरच विराट व्यायाम आणि खाण्यापिण्याच्या सवयींबद्दलही फारच काळजी घेतो. विराट कोहलीला पूर्वी नॉनव्हेज फार आवडायचं. मात्र त्याने 2018 मध्ये नॉनव्हेज सोडलं.
नॉन व्हेज सोडण्यामागील कारणासंदर्भात विराटनेच स्पष्टीकरण दिलं होतं. विराटने यावेळी त्याला असलेल्या सर्वाइल स्पाइन या आजाराचा उल्लेख केलेला.
सर्वाइल स्पाइनच्या समस्येमुळे विराटची करंगळी फार थरथरत असते. विराटची करंगळी ही थंडी वाजल्यानंतर अंग थरथरतं तशी थरथरायची.
याच कारणामुळे विराटला फलंदाजी करताना अडचण यायची. त्याला बॅटची ग्रीप नीट मिळायची नाही. त्यामुळे त्याच्या कामगिरीवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आलेली.
विराट कोहलीच्या शरीरामधील यूरिक अॅसिडचं प्रमाणही सातत्याने वाढत होतं. याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर होऊ लागला.
तसेच विराटला हाडांसंदर्भातीलही समस्या जाणवू लागल्या होत्या. त्याच्या हाडांमधील कॅल्शियम कमी होऊ लागलेलं. पोटात तयार झालेलं यूरिक अॅसिड हाडांमधील कॅल्शियम कमी करण्यास कारणीभूत होतं.
शरीरामधील यूरिक अॅसिडचं प्रमाण कमी करण्यासाठी आणि ते नियंत्रण राहण्यासाठीच विराटने नॉनव्हेज सोडलं.
मध्यंतरी विराट व्हेगन असल्याच्या चर्चाही चांगल्याच रंगल्या होत्या. मात्र त्याने आपण शाकाहारी असल्याचं स्पष्ट केलं होतं.
शाकाहारी आहार सुरु केल्यानंतर विराटला अनेक समस्यांपासून आपसुकच मुक्ती मिळाली. त्याच्या खेळामध्ये आणि फिटनेसमध्येही चांगलीच सुधारणा झाल्याचं पहायला मिळालं. (सर्व फोटो सोशल मीडियावरुन साभार)