Gajra Tradition : केसांमधील गजरा कोणत्याही महिलांच्या सौंदर्यात भर घालतो. गजराचा सुगंध कोणालाही आकर्षित करु शकतो. पण तुम्हाला माहितीय गजरा फक्त सुंदर दिसण्यासाठी नाही तर यामागे शास्त्रीय कारण आहे.
फुलांची राणी असलेल्या चमेलीपासून मोगरा, जुईपर्यंत गजरा केसात माळल्यास महिलांचं सौंदर्य खुलून दिसतं. हिंदू धर्मात गजराचे विशेष महत्त्व असून शुभ कार्यात गजऱ्याशिवाय विधी पूर्ण होत नसतात.
भारतात महिला पूजा, शुभ कार्य आणि सणांमध्ये आवर्जून केसांत गजरा माळतात. आजकाल गजरा लावण्याची खूप फॅशन आली आहे. पण यामागे शास्त्रीय कारण आहे हे तुम्हाला माहितीय का?
तुम्ही दक्षिण भारतातील महिलांना रोज गजरा माळताना पाहिलं असेल. अगदी शास्त्रज्ञ महिलादेखील कितीही मोठ्या पदावर असो त्या गजरा नक्की लावतात.
गजराच्या सुवासाने महिलांचं मनाला शांती मिळते. अतितणावामुळे झोप येत नसेल तर गजऱ्यामुळे फायदा मिळतो.
शरीर आणि मनाचं संतुलन राखण्यासाठी गजरा फायदेशीर ठरतो. केसांच्या माध्यमातून डोक्यावरील त्वचेतील उष्णता गरजा शोषून घेतो.
केसगळती, अवेळी केस पांढरे होणं अशा समस्यापासून गजरा लावल्याने मुक्तता मिळते.
केसातल्या गजऱ्याच्या सुगंधामुळे महिलांना दिवसभर फ्रेश ठेवण्यास मदत मिळते. मनाला शांती आणि प्रसन्नता मिळते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)