PHOTOS

Virat Kohli लवकर का झोपतो? पत्नी Anushka Sharma खुलासा करत म्हणाली, "रात्री 3 पर्यंत..."

Virat Kohli Anushka Sharma Sleeping Routine: बॉलिवूड आणि क्रिकेट क्षेत्रातील सध्याचं सर्वात चर्चेत असलेलं जोडपं म्हणजे अनुष्का शर्मा आणि विराट कोहली. हे दोघेही कोणत्या ना कोणत्या कारणाने कायमच चर्चेत असतात. नुकताच अनुष्काने विराटसंदर्भात एक मोठा खुलासा केला आहे. ती नेमकं काय म्हणाली आहे जाणून घेऊयात...

Advertisement
1/11

सध्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे त्यांच्या झोपण्याच्या सवयीमुळे चर्चेत आले आहेत. इंडियन स्पोर्ट्स अवॉर्ड्सच्या कार्यक्रमामध्ये अनुष्काने विराट आणि तिच्या झोपण्याच्या रुटीनसंदर्भात केलेलं एक विधान चर्चेचा विषय ठरत आहे.

 

2/11

तसे विराट आणि अनुष्का त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील आघाडीच्या व्यक्तीमत्वांपैकी आहेत. अनुष्का सध्याच्या घडीची आघाडीची अभिनेत्री आहे तर क्रिकेटमध्ये विराटच्या तोडीचा फलंदाज सध्याच्या घडीला तरी विचार करुनच सांगावा लागेल अशा फॉर्ममध्ये तो आहे.

3/11

विराट क्रिकेटच्या मैदानात तर अनुष्का मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांचं मनोरंजन करते. हे दोघेही त्यांच्या कामगिरीबरोबरच त्यांचे लूक्स, स्टाइल, सोशल मीडिया पोस्ट आणि कपड्यांमुळेही अनेकदा चर्चेत असतात.

4/11

नुकतेच हे दोघे इंडियन स्पोर्ट्स अवॉर्डस शोमध्ये सहभागी झाले होते. दोघेही या कार्यक्रमामधील आकर्षणाचा केंद्रबिंदू होते असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. 

5/11

या कार्यक्रमामध्ये अनुष्का आणि विराटला त्यांच्या 3 AM Friend बद्दल विचारण्यात आला. यावर अनुष्काने दोघांपैकी कोणीही रात्री 3 ला झोपेतून उठत नाही, असं सांगितलं. तसेच आम्ही दोघेही फार लवकर झोपतो त्यामुळे रात्री 3 पर्यंत जागण्याचा प्रश्नच नाही असंही अनुष्काने सांगितलं.

6/11

विराटच्या झोपेबद्दल खुलासा करताना अनुष्काने, "आमच्यापैकी कोणीही रात्री 3 पर्यंत जागलं तर आम्ही एखाद्या मित्राला नक्की बोलवू. पण आम्हाला रात्री 3 पर्यंत जागं राहण्याची इच्छा नाही. आम्ही फार लवकर झोपतो. त्यामुळेच रात्रीचा मित्र कोण याबद्दल आम्हाला फार रस नाही," असं सांगितलं.

7/11

वामिकाच्या जन्मानंतर विराट आणि अनुष्काने झोपेसंदर्भातील रुटीन काटेकोरपणे पाळण्याचा निर्णय घेतला आहे असंही तिने मुलाखतीत सांगितलं. म्हणजेच मुलीच्या जन्मानंतर या दोघांनीही रात्री उशीरापर्यंतच्या कार्यक्रमांना हजेरी लावणं कमी केलं आणि रुटीन सेट करुन घेतलं.

8/11

अनुष्का आणि विराट आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मुलगी वामिकाला प्राधान्य देतात. अर्थात हे करताना दोघेही त्यांच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहेत. दोघांनीही आपआपल्या करियरमधील वाटचाल सुरु ठेवत मुलीसंदर्भातील जबाबदारी पार पाडत आहेत हे विशेष. 

9/11

आपलं पर्सनल आणि प्रोफेश्नल लाइफ कसं संभाळावं हे अनुष्का आणि विराटकडून शिकावं असं अनेकजण या दोघांबद्दल बोलताना म्हणतात. विराट आणि अनुष्का अनेकदा मुलीसोबत वेगवेगळ्या देशांमध्ये फिरायला जातात.

 

10/11

एका मुलाखतीत अनुष्काला विराट आता उशीरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्यांमध्ये दिसत नाही यासंदर्भात प्रश्न विचारलेला. त्यावर उत्तर देताना अनुष्काने आई-वडील झाल्यानंतर तुमची मुलं तुमच्या प्राधान्य क्रमावर असतात, असं सांगितलेलं. 

11/11

"आम्ही कारण देत नसून हे वास्तव आहे की जेव्हा तुम्हाला मुलंबाळ होतं तेव्हा तुम्ही समाजिक जीवनामध्ये फार रमत नाही. आम्ही दोघेही फार सोशल लाइफ फॉलो करत नसल्याने आम्ही फार समाधानी आहोत. त्यामुळेच जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आम्ही तिघे तो एकत्र घालवण्यास प्राधान्य देतो," असं अनुष्का म्हणाली होती.





Read More