PHOTOS

कमाल! 180 चा स्पीड, 11 लाखांची बाईक... वेगावर जीवापाड प्रेम करणाऱ्या 'या' सौंदर्यवतीवर अख्खा देश फिदा

Bike News :  अशा या वेगावर नितांत प्रेम करणारी एक तरुणी तिच्या बाईक प्रेमामुळं प्रचंड चर्चेत आली आहे. रस्ता नेईल तिथं जाणाऱ्या या तरुणीचे फोटो सध्या सोशल मीडियावरव प्रचंड व्हायरल होत आहेत. 

 

Advertisement
1/8
दिव्या संधू
दिव्या संधू

Bike News :  दिव्या संधू असं या बाईकप्रेमी तरुणीनं लग्नानंतर मोहालीतील जिरकपूर येथे नव्या आयुष्याची सुरुवात केली. तिचा आतापर्यंतचा प्रवास अतिशय खास आणि प्रेरणादायी. 

2/8
राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू
राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू

राष्ट्रीय स्तरावर हँडबॉल खेळणाऱ्या दिव्याला 2003 मधील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये पल्सर बाईक चालवण्याची संधी मिळाली आणि तिथूनच तिच्या प्रवासाची सुरुवात झाली. 

 

3/8
बाईकनं सफर
बाईकनं सफर

आतापर्यंत तिनं थायलंड, बांगलादेश आणि नेपाळची सफर बाईकनं केली आहे. पण, या प्रवासात तिला एका अपघातानं पुरतं खचवलं होतं. 

4/8
वाऱ्याचा वेग
वाऱ्याचा वेग

11 लाखांच्या बाईकवर दिव्या जेव्हा 180 किमी प्रतितास इतका वेग गाठते तेव्हा वाऱ्याच्या वेगानं जाणारी ती सर्वांच्या नजरा वळवते. याच दिव्यानं 2015 मध्ये जीवनातील अतिशय आव्हानात्मक काळाचा सामना केला. 

5/8
भयंकर अपघात
भयंकर अपघात

गुरुग्राममध्ये नोकरीहून परतताना तिचा एक अपघात झाला आणि सारंकाही बदललं, कारण हा अपघातच इतका गंभीर होता. 

6/8
चेहऱ्यावर जबर मार
चेहऱ्यावर जबर मार

दिव्याच्या पोटाला गंभीर दुखापत झाली, चेहऱ्यावर जबर मार बसला, चार दिवस ती कोमात गेली आणि त्यानंतर जिथं इतरांना तिनं आत्मविश्वास गमावला असं वाटत होतं तिथं तिनं मात्र सर्वांना अवाक् केलं. 

7/8
नव्या जोमानं या क्षेत्रात घट्ट पाय रोवून उभी राहिली
नव्या जोमानं या क्षेत्रात घट्ट पाय रोवून उभी राहिली

बाईक रायडिंगवर असणारं प्रेम दिव्यानं कमी होऊ दिलं नाही. उलटपक्षी अपघातानंतर ती नव्या जोमानं या क्षेत्रात घट्ट पाय रोवून उभी राहिली आणि जिद्दीच्या बळावर पुन्हा एकदा वेगाचाच पाठलाग करत ती या प्रवासाला निघाली.

8/8
बाईकप्रेमी दिव्या
बाईकप्रेमी दिव्या

बाईक आणि वेगावर अमर्याद प्रेम करणारी हीच दिव्या आता इतर महिला आणि तरुणींना बाईक रायडिंग शिकवते.  (सर्व छायाचित्र सौजन्य- divya_sandhu__ )





Read More