PHOTOS

भीती जाता कामा नये... 50 वर्षांपूर्वीचा भयपट पाहून आजही बसते दातखिळी, स्वप्नातही दिसतात भूतं

World Best Horror Film : स्वप्नातही दिसतात भूतं... थट्टा नाही, या चित्रपटातील दृश्य पाहून तुम्हीही म्हणाल बापरे!

Advertisement
1/7
भयपटांना पसंती
भयपटांना पसंती

Worlds Horror Film : भयपटांना पसंती देणाऱ्या सिनेप्रेमींचे आवडत्या चित्रपटांसाठीचे काही खास निकष असतात. मग ते कथानक असो, कलाकारांचा अभिनय असो, किंवा त्या चित्रपटाची घाबरवण्याची क्षमता असो. 

2/7
भयपटांचा विषय
भयपटांचा विषय

भयपटांचा विषय जेव्हाजेव्हा निघतो तेव्हातेव्हा काही कलाकृतींची नावं हमखास समोर येतात. आश्चर्याची बाब म्हणजे या यादीत एका अशा चित्रपटाचाही समावेश आहे, जो चक्क 50 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. 

3/7
दातखिळी
दातखिळी

असं सांगितलं जातं, की हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा अनेकांचीच दातखिळी बसली, कोणाचा थरकाप उडाला तर काहींच्या स्वप्नात भुतं आली, काहींना रक्ताच्या उलट्याही झाल्या. 

4/7
चित्रपट
चित्रपट

या चित्रपटाचा उल्लेख शापित चित्रपट म्हणूनही करण्यात आला. आजही या चित्रपटाला पाहून रक्त गोठतं. त्यामुळं तुम्हाला हा चित्रपट पाहायचा असेल तर त्याचे परिणामही भोगायला तयार राहा असंच सांगितलं जातं. 

5/7
एक्झॉर्सिस्ट
एक्झॉर्सिस्ट

या चित्रपटाचं नाव आहे, 'द एक्झॉर्सिस्ट'. ( 1973 Horror Film The Exorcist) असं म्हणतात की या चित्रपटामुळं अनेक महिलांचा गर्भपात झाला होता. सेटवर आग लागून सर्वकाही उध्वस्त झालं होतं. सारंकाही नकारात्मक घडत होतं. ज्यामुळं शापित चित्रपट म्हणूनच या चित्रपटाकडे पाहिलं गेलं. 

 

6/7
ऑस्कर
ऑस्कर

दोन ऑस्कर पुरस्कार आणि एक गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळवणाऱ्या या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर त्यातील एका अभिनेत्याचा रहस्यमयी मृत्यू झाला होता. चित्रपटाच्या सेटवर घडणाऱ्या गोष्टी पाहून दिग्दर्शकाचाही नकारात्मक शक्तींवर विश्वास बसला होता. 

 

7/7
कमाई
कमाई

विकीपीडियानुसार 12 मिलियन डॉलरच्या निर्मिती खर्चात साकारलेल्या या चित्रपटानं  441.3 मिलियन डॉलर इतकी कमाई केली होती. ऑनलाईन विविध माध्यमांवर हा चित्रपट प्रेक्षकांसाठी उपलब्ध असल्याचं सांगितलं जातं. 

 





Read More