जगभरात अनेक चित्रपट रेकॉर्ड ब्रेक कमाई करतात. ज्यांची गिनीज बुकमध्ये नोंद होते. पण असा एक चित्रपट आहे ज्यांची सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट म्हणून गिनीज बुकमध्ये नोंद आहे.
जगभरात हॉलिवूड चित्रपट हे सर्वात जास्त कमाई करणारे चित्रपट म्हणून ओळखले जातात. ज्यामध्ये 'अवतार', 'अवेंजर्स' आणि 'टायटॅनिक' यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
त्याचबरोबर दुसरीकडे सर्वात फ्लॉप चित्रपटाचा रेकॉर्ड देखील हॉलिवूडच्या नावावर आहे. ज्यामुळे निर्मात्याचे 1300 कोटींचे नुकसान झाले.
आज आम्ही तुम्हाला अशा एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जो 13 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. ज्याला जगातील सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट असं म्हटलं जात आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड फ्लॉप ठरला.
या चित्रपटाचे नाव 'जॉन कार्टर' आहे. हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता. निर्मात्यांनी हा चित्रपट बनवण्यासाठी 250 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स खर्च केले होते.
या चित्रपटाची निर्मिती वॉल्ट डिज्नी पिक्चर्सने केली होती. तर दिग्दर्शन एंड्रयू स्टैंटन यांनी केलं होतं. या चित्रपटाने जगभरात 2457 कोटी रुपयांची कमाई केली होती.
सर्वात जास्त कमाई परदेशातून झाली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 73 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये 631 कोटी रुपयांची कमाई केली होती.
या चित्रपटाने बजेटपेक्षा जास्त कमाई केली होती. परंतु, निर्मात्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते.गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार या चित्रपटाचे 1393.45 कोटी रुपयांचे नुकसान झाले.
कारण चित्रपटाच्या कमाईचा मोठा भाग थिएटर मालकांना मिळाला. मार्केटिंगवर देखील मोठा खर्च करण्यात आला होता. त्यामुळे निर्माते चित्रपटाचे बजेट वसूल करू शकले नाहीत.