World Blood Donor Day 2024: दरवर्षी 14 जून हा दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने रक्तदान वर्षातून किती वेळा करता येतं. कोणी रक्तदान करावे आणि कोणी करु नये यासंदर्भात माहिती जाणून घ्या.
14 जून हा नोबेल पारितोषिक विजेते कार्ल लँडस्टेनर यांचा वाढदिवस असतो. या शास्त्रज्ञांनी ABO रक्तगट प्रणालीचा शोध लावला होता. रक्त दान हे श्रेष्ठदान मानलं जातं. एका व्यक्तीच्या रक्तदानामुळे तीन जणांचा जीव वाचतो.
तुमचं वय हे 18 वर्षांचं असेल तर तुम्ही रक्तदान करु शकता. शिवाय वयाच्या 65 व्या वर्षांपर्यंत आरोग्य स्थिती योग्य असल्यास तुम्ही रक्तदान करण्यास हरकत नाही.
त्याशिवाय रक्तदान करणाऱ्या व्यक्तीचं वजन 46 किलो असावं तर हिमोग्लोबिन किमान 12.5 ग्रॅम असायला हवं.
रक्तदान करताना एका व्यक्तीच्या शरीरातून एकावेळी 300 ते 400 मिली रक्त घेतलं जातं. तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि आहार पौषक असेल तर 24 तासांच्या आत नवीन रक्त तयार होतं.
आपल्या शरीरातील लाल रक्तपेशी 90 ते 120 दिवसात स्वतःच मरतात. म्हणूनच दर तीन महिन्यांनी रक्तदान करता येते.
तुम्ही 2 महिन्यांतून किंवा 56 दिवसांतून एकदा रक्तदान करू शकता. हे त्यांच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी चांगले आहे. तर एका वर्षात आपण 4 ते 6 वेळा रक्तदान करू शकतो.
उच्च किंवा कमी रक्तदाबाचा त्रास, टीबी रुग्ण, एड्सच्या रुग्ण आणि गंभीर आजार असलेल्या लोक रक्तदान करु शकत नाही. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)