Cristiano Ronaldo Privet Jet Photos : प्रायव्हेट जेट इतकं कमाल की, पाहून म्हणाल अरेच्छा विमान इतकं भारी की घरी जायची गरजच नाही.
पोर्तुगालच्या संघातील हा खेळाडू त्याच्या खेळासोबतच आणखी एका कारणामुळेही चर्चेत आहे. ते कारण म्हणजे रोनाल्डोची डोळे दीपवणारी जीवनशैली.
आलिशान घरांपासून ते महागड्या कार आणि प्रायव्हेट जेटची आवड असणाऱ्या या खेळाडूचा अनेकांनाच हेवा वाटतो. तुम्हाला माहितीये का, त्याच्याकडे तब्बल 190 कोटी रुपयांचं एक प्रायव्हेट जेट आहे.
या जेटचे अंतरंग पाहिलं असता ते कोणा एका महालाहून कमी नाही हे लगेचच लक्षात येतं.
सोफा सेट, वायफाय इथपासून ते उत्तम दर्जाचं इंटेरियर त्याच्या या जेटमध्ये पाहायला मिळतं.
10 माणसांना नेण्याची क्षमता असणाऱ्या या जेटचे काही फोटो रोनाल्डोडी प्रेयसी जॉर्जिया रोनाल्डोनं शेअर केले आहेत. सध्या हे फोटो नेटकरी वारंवार पाहत आहेत.