World Cup 2023 Who Said What On India Win Over Australia: वर्ल्डकप 2023 च्या आपल्या पहिल्याच सामन्यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियावर 6 गडी आणि 52 चेंडू राखून विजय मिळवला. 2 धावांवर 3 गडी बाद अशी स्थिती असताना विराट कोहली आणि के. एल. राहुलने संयमी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. या विजयानंतर भारतीय आजी-माजी क्रिकेटपटूंबरोबरच परदेशी क्रिकेटपटूही भारताच्या कामगिरीने इम्प्रेस झालेत. कोण काय म्हणालं आहे पाहूयात...
चेन्नईमधील चेपॉकच्या मैदानावर झालेल्या सामन्यात भारताची सुरुवात फारच अडखळती झाली. 200 धावांचा पाठलाग करताना विराट कोहली आणि के. एल. राहुलने केलेल्या 165 धावांच्या पार्टनरशीपच्या जोरावर भारताला विजय मिळवता आला. मात्र दुर्देवाने या दोघांना शतक झळकावता आलं नाही.
विराट 85 धावांवर बाद झाला. तर दुसरीकडे भारताला 9 ओव्हरमध्ये विजयासाठी 5 धावांची गरज असताना के. एल. राहुलला शतक झळकावण्यासाठी 9 धावांची गरज होती. मात्र चौकार मारण्याच्या नादात के. एल. राहुलने षटकार लगावत सामना तर जिंकवला पण त्याचं शतकं हुकलं. भारताच्या या विजयानंतर अनेकांनी खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. कोण काय म्हणालं आहे पाहूयात...
तणवामध्ये विराट, के. एल. राहुल छान खेळले असं व्ही. व्ही. एस. लक्ष्मण म्हणाला.
पाकिस्तानचा माजी खेळाडू साईद अजमलने विराट आणि के. एल. राहुलचं कौतुक केलं.
कुंबळेनेही भारताच्या विजयावर प्रतिक्रिया नोंदवली.
सचिन तेंडुलकरने विराट आणि के. एल. राहुल स्वत:चा वेळ घेऊन उत्तम खेळले असं म्हणत कौतुक केलं आहे.
पुजारानेही भारताच्या विजयानंतर प्रतिक्रिया नोंदवली.
व्यंकटेश प्रसादनेही विराट आणि के. एल. राहुलचा फोटो पोस्ट करत आनंद व्यक्त केलं.
पठाण बंधुंनीही भारतीय संघाचं कौतुक केलं आहे.
संजय मांजरेकर यांनी विराट आणि के. एल. राहुलबरोबरच जडेजाचंही कौतुक केलं आहे.
तणाव त्यांना जाणवला नाही, असं वसीम जाफरने विराट आणि के. एल. राहुलचं कौतुक केलं आहे.
छोटा हार्ट अटॅक आला होता फलंदाजीची सुरुवात पाहून असं दिनेश कार्तिकने म्हटलं आहे.
विराटचे 100 व्हायला हवे होते असं युवराज सिंगने म्हटलं आहे. तर हा सामना इतरांना इशारा असल्याचं हर्षा भोगलेंनी म्हटलं आहे.
खेळाडूंचा आत्मविश्वास वाढेल असं हरभजनने भारताच्या विजयानंतर म्हटलं आहे.
विरेंद्र सेहवागने एक अनोखी कविता पोस्ट करत भारताचा विजय साजरा केला आहे.
शोएब अख्तरने भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यानंतर ट्वीटरवरुन कौतुक करताना, 'अशापद्धतीने सामन्यात पुनरागमन करतात', असं म्हटलं आहे.
मोहम्मद कैफने विराट कोहलीला चेस मास्टर म्हणत त्याचं कौतुक केलं आहे.