PHOTOS

Maxwell च्या 201* खेळीनंतर पत्नी विनि रमणची Insta Story चर्चेत; 'ती' फोटो कॅप्शन Viral

Maxwell Wife Instagram Story After Husband Scored 201* Vs Afghanistan: ग्लेन मॅक्सवेल ऑस्ट्रेलियन संघाचा स्कोअरकार्ड 91 वर 7 बाद वरुन ऑस्ट्रेलियन संघाला 293 वर 7 बादपर्यंत घेऊन गेला आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. मॅक्सवेलने नाबाद द्विशतक झळकावण्याचा भीमपराक्रम केला तेव्हा त्याची पत्नी विनि रमण मैदानातच होती. तिने सामना सुरु असताना पोस्ट केलेली इन्स्टाग्राम स्टोरी सध्या चर्चेचा विषय ठरतेय. ती काय म्हणालीय पाहूयात..

Advertisement
1/17

ऑस्ट्रेलियन फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरुद्धचा सामना एकहाती जिंकून दिला. 

2/17

मॅक्सवेलने मिळवून दिलेल्या या विजयामुळे ऑस्ट्रेलिया हा वर्ल्ड कप 2023 च्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा तिसरा संघ ठरला आहे.

3/17

292 धावांचा पाठलाग करताना 91 धावांच्या आत 7 गडी बाद झालेले असताना मॅक्सवेल आणि पॅट कमिन्स या दोघांनी अधिक पडझड न होऊ देता सामना जिंकवून दिला.

4/17

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघाच्या तोंडचा विजयाचा घास मॅक्सवेलने ओढून घेतला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

5/17

मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये नाबाद 201 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून द्विशतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. 

 

6/17

मॅक्सवेलच्या या खेळीने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. धावांचा पाठलाग करताना द्विशतक झळकावणारा मॅक्सवेल पहिला खेळाडू ठरला आहे. तर वर्ल्ड कपमध्ये द्विशतक झळकावणारा मॅक्सवेल हा पहिलाच खेळाडू ठरलाय.

7/17

मॅक्सवेलच्या पायामध्ये क्रॅम्प आलेला असतानाही त्याने मैदान सोडलं नाही. मॅक्सवेल खेळणार नाही असं वाटत असतानाही तो शेवटपर्यंत मैदानावर उभा होता.

8/17

मॅक्सवेल पायाला क्रॅम्प आल्याने पळून धावा काढत नव्हता. एका बाजूला पॅट कमिन्स ओव्हर खेळून काढताना दुसरीकडे मॅक्सवेल चौकार, षटकारांमधून धावा जमवत होता.

9/17

मॅक्सवेल आणि पॅट कमिन्स आठव्या विकेटसाठी विक्रमी पार्टनरशीप करत सामना जिंकून दिला.

10/17

ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानदरम्यानचा हा सामना पाहण्यासाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मॅक्सवेलची पत्नी विनि रमणही आली होती.

11/17

पती मॅक्सवेलने नाबाद 201 धाव झळकावल्यानंतर विनि रमणने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

 

12/17

विनि रमणने मैदानात मॅक्सवेल फलंदाजी करत असतानाचा स्टॅण्डमधून काढलेला फोटो पोस्ट केला.

13/17

विनि रमणने 201 नाबाद असा आकडा लिहून ऑल द इमोशन्स अशा कॅप्शनसहीत प्रेम दर्शवणारे इमोजी वापरत इन्सा स्टोरी पोस्ट केली आहे. 

14/17

विनि ही मूळची भारतीय असून मागील वर्षीच हे दोघे लग्नबंधनात अडकले. मॅक्सवेल आणि विनिने 18 मार्च 2022 रोजी लग्न केलं होतं.

 

15/17

भारतीय पंरपरेनुसार अगदी थाटामाटात या दोघांनी लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाचे फोटोही चांगलेच चर्चेत होते. 27 मार्च 2022 रोजी त्यांनी तमिळ रितीरिवाजांनुसार लग्न केलं होतं. 

16/17

लग्नात अगदी वधू आणि वराला उचलून घेत एकमेकांना वरमाला घातल्याचे फोटोही या दोघांनी शेअर केले होते. अगदी हळदीचा कार्यक्रमही विनि आणि मॅक्सवेलने मनापासून एन्जॉय केला होता.

17/17

दोघांनी ख्रिश्चन पद्धतीनेही लग्न केलं होतं. लग्नाआधी अनेक वर्ष हे दोघे एकमेकांना डेट करत होते. मेलबर्नमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या विनिची मॅक्सवेलबरोबर ओळख झाल्यानंतर हे दोघे प्रेमात पडले होते. 





Read More