World Food Safety Day : तुम्हाला दूध, बटाटा, दही खायला आवडते का? त्याचबरोबर हे पदार्थ खाल्लानंतर तुम्ही काहीही मिळेल तो पदार्थ खाता का? जर असं असेल तर ते तुमच्यासाठी अनेक समस्या निर्माण करु शकते. चला तर जाणून घेऊया दूध, बटाटा, दह्यासोबत कोणत्या गोष्टींचे सेवन करणे हानीकारक असते...
जागतिक अन्न सुरक्षा दिन दरवर्षी 7 जून रोजी साजरा केला जातो. पौष्टिक पदार्थांचे सेवन न केल्यामुळे अनेक आजार होऊ शकतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, असुरक्षित अन्नामुळे दररोज 1.6 दशलक्ष लोक आजारी पडतात. यामुळे डायरियापासून कॅन्सरपर्यंत 200 आजार होऊ शकतात.
काही पदार्थ एकत्र खाण्यास मनाई आहे. यामुळे, खराब पचन, विष तयार होणे, पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे तुम्ही आजारी पडू शकता आणि अन्नातून विषबाधा होऊ शकते. अन्न विषबाधा झाल्यास काही लक्षणे दिसू शकतात. यामध्ये अतिसार, पोटदुखी, मळमळ, उलट्या, ताप, थंडी वाजून येणे इ. म्हणूनच खालील पदार्थ एकत्र कधीच खाऊ नयेत.
दुधासोबत फळे, खरबूज, आंबट फळे, केळी, समोसे, पराठे, खिचडी आदींचे सेवन दुधासोबत करू नका. जर या पदार्थासोबत तुम्ही दुधाचे सेवन केल्याने अनेक आजार होऊ शकतात.
तुम्ही रोज धान्य खातात तर कधी कधी त्यासोबत फळे ही खातो. आयुर्वेदानुसार फळे आणि साबुदाणासोबत अन्नधान्य खाणे घातक ठरू शकते.
प्रथिनेयुक्त अन्न
उन्हाळ्यात दही खाणे चांगले. कारण पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. पण त्यासोबत खाल्लेल्या गोष्टी खाल्ल्यास पोट खराब होऊ शकते. जसे की, बीन्स, चीज, गरम पेय, लिंबूवर्गीय फळे, आंबा, अंडी आणि मासे दह्यासोबत खाऊ नयेत.