जास्त गप्पा करणे आरोग्यदायी असते, असे जर तुम्हाला कोणी सांगितले तर खरे वाटणार नाही. पण हे अगदी खरे आहे. आपल्या मित्रांसोबत मनमोकळ्या गप्पा मारणे फायदेशीर ठरेल. त्यामुळे मन हलके होते. ताण कमी होतो. गप्पा मारणे हे उत्तम स्ट्रेस बस्टर होते.
मनात कोणतीही गोष्ट ठेवणे मानसिक आरोग्यासाठी नुकसानकारक असतेच. पण त्याचबरोबर त्याचा परिणाम शरीरावरही होतो.
त्यामुळे ताण वाढतो.
तुमच्या मनाला खटकणारी कोणतीही गोष्ट जेव्हा तुम्ही लपवण्याचा प्रयत्न करता तेव्हा नकारात्मक विचार वाढू लागतात. राग येतो, चिडचिड होते.
जे लोक गोष्टी मनातच ठेवताच ते कामावर नीट लक्ष देऊ शकत नाहीत. परिणामी कामावर परिणाम होऊ लागतो.
जे लोक मनमोकळेपणाने बोलतात त्यांच्यात ताणाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे ते आव्हानंही उत्तमरित्या सांभाळू शकतात.
म्हणून आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आणि चांगले परफॉर्मर होण्यासाठी खूप गप्पा मारा.