जगात दूध निर्मितीच्या क्षेत्रामध्ये भारत अव्वल स्थानी आहे. आज जागतिक दूध दिनी याचं खास महत्त्व आहे. भारतात प्रतिवर्षी 165 मिलियन टन दूधाची निर्मिती केली जाते.
दूधाप्रमाणेच दही, तूप, पनीर, खवा असे पदार्थ लोकप्रिय आहेत. उन्हाळ्यात डीहायड्रेशनचा त्रास टाळण्यासाठी अधिक पेयांंचा आहारात समावेश करणं आवश्यक आहे. मग उन्हाळ्यात तुम्ही थंडगार मिल्कशेकचा आस्वाद घेऊ शकता. यामुळे चविष्ट पदार्थांसोबतच शरीराला प्रोटीन घटक मिळण्यास मदत होते.
शाही शेक - ड्रायफ्रुट्स आणि खजूर यांंना दूधामध्ये मिसळून पिणं आरोग्यवर्धक आहे. खजूरातून शरीराला आयर्न मिळते तर सुकामेव्यामुळे अवेळी लागणारी भूक आटोक्यात राहण्यास मदत होते.
फळांचा मिल्क शेक : कोणत्याही गोड फळांचा मिल्कशेकमध्ये समावेश करता येऊ शकतो. त्यामुळे सीझननुसार गोड चिकू, केळं,स्ट्रॉबेरी यांचा मिल्कशेकमध्ये समावेश करा.
आंब्याचा मिल्क शेक - आंबा हा फळांचा राजा आणि उन्हाळ्यात केवळ चार महिने मुबलक उपलब्ध असल्याने त्याचा आस्वाद घ्या. उन्हाळ्याच्या दिवसात गोड आंब्याच्या फोडीसह बर्फ आणि दूध मिसळून मिल्कशेक बनवा.(फोटो साभार : फेसबुक)