PHOTOS

...आणि अंटार्क्टिकाच्या बर्फातून आवाज येऊ लागले; NASA नं हेरल्या रहस्यमयी ध्वनीलहरी, शास्त्रज्ञही नि:शब्द

अशीच एक जागा आणि त्या जागेचं एक रहस्य नुकतंच जगासमोर आलं असू...

Advertisement
1/8
Antarctica
Antarctica

Antarctica Weird Sounds: शास्त्रज्ञांनी आजवर अनेक विषयांमागची गूढ रहस्य जगासमोर आणली असून अंतराळापासून ते अगदी पृथ्वीच्या दोन्ही धृवांचाही यात समावेश आहे. (छाया सौजन्य- AI)

2/8
antarctica
antarctica

आतासुद्धा अशीच एक बाब समोर आल्यानं संशोधकांसह सामान्यांच्या कुतूहलालाही चालना मिळाली आहे. संपूर्णत: बर्फाचं अच्छादन असणाऱ्या अंटार्क्टिका क्षेत्रातून अभ्यासक आणि शास्त्रज्ञांना काही अनपेक्षित रेडिओ सिग्नल मिळाले आहेत.

3/8
antarctica
antarctica

अंटार्क्टिका क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या भागातील संशोधकांना बर्फाखालून काही अनपेक्षित ध्वनीलहरी हेरता आल्या आहेत. अंटार्क्टिक इंपल्सिव्ह अँटिनाचा वापर करत या लहरी ऐकल्या गेल्या असून NASA च्या प्रकल्पाअंतर्गत हे साध्य झालं आहे.

4/8
antarctica
antarctica

हे आवाज अवकाशातून नव्हे, तर पृथ्वीच्या उदरतून येत असल्यानं संशोधकसुद्धा हैराण झाले आहेत. या ध्वनीलहरी न्यूट्रिनो अर्थात रहस्यमयी कण नसल्याचंसुद्धा शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं आहे. (छाया सौजन्य- AI)

5/8
antarctica
antarctica

प्राथमिक स्वरुपात समोर आलेल्या माहितीनुसार पर्वतांमधून येणारा हा आवाज इतका मोठा आहे ती हजारो किलोमीटरच्या पर्वतांमधूनही तो पृष्ठापर्यंत तितक्याच स्पष्टपणे ऐकू येत आहे. (छाया सौजन्य- AI)

6/8
antarctica
antarctica

काही शास्त्रज्ञांनी हा आवाज बर्फ आणि अवकाशाच्या आजुबाजूला असणाऱ्या डार्क मॅटर किंवा एखाद्या अज्ञात Radio Signals शी संबंधित असल्याची शक्यतासुद्धा वर्तवली आहे.

7/8
antarctica
antarctica

अंटार्क्टिकातील मोठ्या बर्फाच्छादित प्रदेशाखाली नेमकं काय आहे हे माहित करुन घेण्यासाठी अधिकाधिक निरीक्षण आणि माहितीची गरज असल्याचं काही शास्त्रज्ञांचं ठाम मत आहे.

8/8
antarctica
antarctica

तेव्हा आता नासानं हेरलेल्या या ध्वनीलहरींचा नेमका अर्थ काय, हा आवाज नेमका कुठून आला यासंदर्भात निरीक्षणातून समोर येणारी माहितीच सर्व गोष्टी उलगडू शकेल असं म्हणणं गैर नाही. (छाया सौजन्य- AI)





Read More