जागतिक लोकसंख्या दिवस 11 जुलै रोजी साजरा केला जातो. लोकसंख्येबद्दल जनतेला जागृक करणे आणि लोकांमध्ये परिवार नियोजनाचे महत्व पटवून देणे हा यामागचा उद्देश आहे. वेगाने वाढती लोकसंख्या आणि तितक्याच वेगाने वाढणारी आव्हाने याप्रती हा दिवस आपल्याला जागरुक करतो. हा 5 अब्ज दिवस मानला जातो.1989 मध्ये जगाची लोकसंख्या 5 अब्जावर थांबली होती.
World Population Day 2024: जागतिक लोकसंख्या दिवस 11 जुलै रोजी साजरा केला जातो. लोकसंख्येबद्दल जनतेला जागृक करणे आणि लोकांमध्ये परिवार नियोजनाचे महत्व पटवून देणे हा यामागचा उद्देश आहे. वेगाने वाढती लोकसंख्या आणि तितक्याच वेगाने वाढणारी आव्हाने याप्रती हा दिवस आपल्याला जागरुक करतो. हा 5 अब्ज दिवस मानला जातो.1989 मध्ये जगाची लोकसंख्या 5 अब्जावर थांबली होती.
दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिवसाची थीम नवीन असते. यंदाची थीम ‘कोणालाही मागे ठेवू नका, सर्वांना मोजा’ अशी ठेवण्यात आली आहे. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामद्वारे संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या समन्वयाने दरवर्षी नवीन थीम ठरवली जाते.
जागतिक लोकसंख्या दिवस पहिल्यांदा 1989 मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाद्वारे साजरा करण्यात आला. 11 जुलै 1987 रोजी जगाची लोकसंख्या 5 अब्ज इतकी नोंदवली गेली होती. त्यामुळे जगभरातील देशांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं होतं.
या घटनेने वाढती लोकसंख्या आणि त्याच्याशी निगडित आव्हानांकडे लोकांचे लक्ष वेधले गेले. 11 जुलै 1989 रोजी पहिल्यांदाच जागतिक लोकसंख्या दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. 1990 पासून देशभरात जागतिक लोकसंख्या दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने यासंदर्भात निर्णय घेतला.
जागतिक लोकसंख्या दिनाच्या माध्यमातून जगातील प्रत्येक देशाची सरकारे, संस्था आणि लोकसंख्येशी संबंधित सर्व लोकांना लोकसंख्येशी संबंधित प्रश्नांवर काय मार्ग काढायला हवा? याबद्दल जागरुक केले जाते.
जागतिक स्तरावर वाढणारी लोकसंख्या आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांवर उपाय शोधणे तसेच कुटुंब नियोजनाद्वारे भविष्यात वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणे हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे.
7 जुलै 2024 पर्यंत भारताची सध्याची लोकसंख्या 1,441,910,332 आहे. ही आकडेवारी संयुक्त राष्ट्रांच्या वर्ल्डोमीटर विस्तारावर आधारित आहे. यापैकी पुरुषांची लोकसंख्या 717.10 दशलक्ष तर महिलांची लोकसंख्या 662.90 दशलक्ष आहे. येत्या 77 वर्षांत लोकसंख्या दुप्पट होईल, अशी भीती वर्तवली जात आहे. भारताची लोकसंख्या जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 17.76% इतकी आहे.
जागतिक लोकसंख्या दिनाचे उद्दिष्ट वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणे आणि त्याच्याशी संबंधित समस्यांवर उपाय शोधणे हे आहे. म्हणून जनजागृती मोहीम, कला आणि सांस्कृतिक कार्यक्रम आणि युवकांच्या सहभागातून हा दिवस साजरा केला जातो.x