मसाला इडली हा प्रकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता. यामध्ये इडली मसाल्याच्या फोडणीमध्ये परता आणि बार्बेक्युप्रमाणे ढोबळी मिरची, पनीरसोबत रचुन ठेवा.
इडली बनवताना पोह्याचा वापर केल्यास त्या अधिक लुसलुशीत होतात. या इडलीमध्ये ग्ल्यासमिक इंडेक्स कमी असल्याने मधूमेहींसाठी हा हेल्दी नाश्त्याचा पर्याय आहे.
मूगडाळ इडली हा प्रकार कॅलरी कॉन्शियन्स आणि मधूमेहाच्या रुग्णांंसाठी मूगडाळीची इडली हा हेल्दी पर्याय आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात फणस मुबलक मिळतो. अशावेळेस थोड्या हटके स्वरूपात इडली बनवायची असेल तर बॅटरमध्येच फणस मिसळा.
इडलीला चविष्ट करण्यासाठी त्याच्या बॅटरमध्ये आवडीनुसार भाज्या किसून किंवा अगदी बारीक चिरून मिसळा.
इडली हलकी फुलकी आणि पचायला सोपी असल्याने अनेकदा ब्रेकफास्टला आवडीने बनवली जाते.पण नेहमी एकाचप्रकारे बनवली जाणारी इडली कंटाळावाणी वाटते. म्हणूनच इडलीला हे हेल्दी ट्विस्ट देऊन पहा