PHOTOS

Chenab Railway Bridge: जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रीजचं कोकण कनेक्शन माहितीये का?

...
Advertisement
1/8
Chenab Railway Bridge: जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रीजचं कोकण कनेक्शन माहितीये का?
 Chenab Railway Bridge: जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रीजचं कोकण कनेक्शन माहितीये का?

जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात असलेल्या चिनाब पुलाचं आज उदघाटन झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुलाचं लोकार्पण झालं आहे. विशेष म्हणजे हा पूल पूर्ण होण्यासाठी 22 वर्ष लागली आहेत. 

 

2/8

जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज म्हणून याकडे पाहिलं जातं. या ब्रिजचे थेट कोकण रेल्वेशी कनेक्शन आहे. काय आहे हे कनेक्शन जाणून घेऊयात. 

 

3/8

चिनाब रेल्वे पूलाची 467 मी लांबीची ही कमान कोकण रेल्वे कोर्पोरेशन लिमिटेडने बांधली आहे. चिनाबच्या दोन किनाऱ्यांना जोडणे हे आव्हानात्मक काम होतं मात्र कोकण रेल्वेच्या इंजिनिअर्सने हे काम लिलया पेललं आणि कमान बसवण्यात आली होती. आज हा ब्रिज दिमाखात उभा आहे. 

4/8

हा पुल तयार करण्यासाठी विविध देशातील तज्ज्ञांची व तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली. तसंच, या पुलाच्या कामासाठी 200 पेक्षा जास्त इंजिनिअर आणि 3000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र मेहनत घेतली होती. 

5/8

चिनाब पूल हा जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंकचा एक भाग आहे. या पुलाच्या निर्माणासाठी 1486 कोटींचा खर्च अपेक्षित होता. हा पूल 266 किमी प्रति तास हवेच्या गतीचा सामना करु शकतो.

6/8

चिनाब पूल बांधण्यासाठी तब्बल 22 वर्ष लागली असून पुलाची उंची चिनाब नदीच्या तळापासून 1,178 फूट आहे. तर आयफेल टॉवरपेक्षा चिनाब पूल उंच तर कुतुबमिनारपेक्षा चिनाब पूल 5 पट जास्त उंच आहे. 

 

7/8

भूकंप, जोरदार वा-याचाही पुलावर कोणताही परिणाम होणार नाही. तसंच, पुलासाठी 30 हजार मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. 

8/8

 चिनाब पुलामुळं काश्मीर आता रेल्वे मार्गानेही जोडले जाणार आहे. त्यामुळं पर्यटकांची संख्यादेखील वाढणार आहे. 





Read More