Year Ender Year in Search 2024 Top 10 People Indian Search: या वर्षात भारतीयांनी सर्वाधिक कोणत्या भारतीय व्यक्तींना गुगलवर सर्च केलं याची यादी गुगलनेच Year in Search 2024 या अहवालात जारी केली आहे. या यादीत पहिल्या 3 क्रमांकावरील व्यक्ती पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.
2024 हे वर्ष आयपीएल, लोकसभा निवडणुका, महाराष्ट्रासहीत अनेक राज्यांमधील निवडणुकांबरोबरच पॅरिस ऑलिम्पिक 2024 मुळे चर्चेत राहिलं. मात्र या वर्षात भारतीयांनी सर्वाधिक कोणत्या भारतीय व्यक्तींना गुगलवर सर्च केलं याची यादी गुगलनेच Year in Search 2024 या अहवालात जारी केली आहे.
गुगलने जारी केलेल्या या यादीत पहिल्या 3 क्रमांकावरील व्यक्ती पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. चला तर पाहूयात भारतीयांनी 2024 साली सर्वाधिक सर्च केलेल्या भारतीय व्यक्ती कोण आहेत.
23 वर्षीय भारतीय स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन या यादीमध्ये दहाव्या स्थानी आहे. यंदाच्या वर्षी त्याचे पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले असले तरी तो सर्वाधिक सर्च झालेल्या भारतीयांच्या यादीत झळकलाय.
आयपीएल 2024 मध्ये धावांचा पाऊस पाडणारा सनरायझर्स हैदराबादचा तरुण क्रिकेटपटू अभिषेक शर्मा या यादीत नवव्या स्थानी आहे.
अंबानी कुटुंबाची धाकटी सून राधिका मर्चंट ही भारतीयांनी सर्वाधिक गुगल सर्च केलेल्या व्यक्तींच्या यादीत आठव्या स्थानी आहे.
अभिनेत्री पुनम पांडे ही भारतीयांनी सर्वाधिक गुगल सर्च केलेल्या व्यक्तींच्या यादीत सातव्या स्थानी आहे. मध्यंतरी पुनम पांडेचा मृत्यू झाल्याची अफवा उठली होती. त्यामुळे तिच्याबद्दल मोठ्या प्रमाणात सर्च झालं.
पंजाब किंग्ज इलेव्हनचा तरुण फलंदाज शशांक सिंहने त्याच्या तफडफार फलंदाजीने आयपीएल 2024 मध्ये अनेकांचं लक्ष वेधत गुगलवर सर्वाधिक सर्च होणाऱ्या व्यक्तींच्या यादीत सहावं स्थानही पटकावलं आहे.
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री तसेच अभिनेता असलेले पवन कल्याण हे भारतीयांनी सर्वाधिक गुगल सर्च केलेल्या भारतीयांच्या यादीत पाचव्या स्थानी आहेत.
आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार राहिलेला भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या हा या वर्षी सर्वाधिक सर्च झालेल्या व्यक्तींमध्ये टॉप पाचमध्ये आहे. तो या यादीत चौथ्या स्थानी आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार झालेले चिराग पासवान हे भारतीयांनी सर्वाधिक सर्च केलेले तिसरे भारतीय ठरले आहेत.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे सन 2024 साली भारतीयांनी सर्वाधिक गुगल सर्च केलेल्या व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत.
भारतीयांनी सर्वाधिक सर्च केलेल्या व्यक्तींच्या यादीमध्ये वजन काही ग्रामने वाढल्याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पदक थोडक्यात हुकलेली विनेश फोगाट पहिल्या क्रमांकावर आहे.