बॉलिवूडमध्ये अनेक रोमँटिक चित्रपट आहेत. जे पाहून लोकांच्या मनात प्रेमाची भावना जागृत होते. ते चित्रपट तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत OTT वर पाहू शकता. कोणते आहेत ते चित्रपट? जाणून घ्या सविस्तर
बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय चित्रपटाचे नाव 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि काजोल मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात त्यांची प्रेमकहाणी आहे. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.
रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणचा 'गोलियों की रासलीला राम-लीला' हा चित्रपट देखील खूप हिट झाला होता. यामध्ये दोघांचे रोमँटिक सीन बघायला मिळतात. हा चित्रपट jio Prime वर तुम्ही मोफत पाहू शकता.
विवेक ओबेरॉय आणि राणी मुखर्जी यांचा सुपरहिट चित्रपट 'साथिया' या चित्रपटात सुंदर प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.
माधुरी दीक्षित आणि सलमान खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'हम आपके हैं कौन' खूपच जबरदस्त आहे. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.
शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांचा मुख्य भूमिका असलेला 'कुछ कुछ होता है' हा चित्रपट देखील खूप रोमँटिक आहे. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.
नरगीस दत्त आणि राज कपूर यांचा 'श्री 420' हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटातील 'प्यार हुआ इकरार हुआ' हे गाणे आजही प्रेक्षकांना आवडते. हा चित्रपट तुम्ही युटूबवर फ्रीमध्ये पाहू शकता.