PHOTOS

Credit Card वर 'या' 5 गोष्टींसाठी भरावे लागतात पैसे, बँक एजंटही तुमच्यापासून लपवतात 'ही' माहिती

क्रेडिट कार्ड (Credit Card) आता सहज कुणालाही उपलब्ध होतं. मात्र क्रेडिट कार्ड वापरताना त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला असणे देखील तितकेच महत्वाचे आहे. क्रेडिट कार्डवर अनेक प्रकारचे शुल्क आकारले जाते, ज्याबद्दल बँक किंवा एजंट तुम्हाला सविस्तर माहिती देत नाही. क्रेडिट कार्ड्वर सूट आणि रिवॉर्ड पॉइंट्सबद्दल (credit card discounts and reward points) सांगणारे तुम्हाला अनेक लोक भेटतात. मात्र यावर सर्व सवलतीच्या क्रेडिट कार्डांवर काही शुल्क देखील भरावे लागतात.  त्यामुळे क्रेडिट कार्डवरील शुल्कांबद्दल (credit card charges) जाणून घेणे आवश्यक आहे. 

Advertisement
1/5
वार्षिक शुल्क (Annual fee)
वार्षिक शुल्क (Annual fee)

मोफत क्रेडिट कार्डची ऑफर एका वर्षात संपल्यानंतर कार्डचा प्रकार आणि क्रेडिट मर्यादा लक्षात घेऊन वार्षिक शुल्क आकारले जाते. हे शुल्क वेगवेगळ्या बँका वेगवेगळे आकारतात. यामध्ये शक्यतो 500 ते 3,000 रुपयांपर्यंत शुल्क असू शकते. 

2/5
उशीरा पेमेंट शुल्क (Late payment charges)
उशीरा पेमेंट शुल्क (Late payment charges)

जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे घेतलेल्या कर्जाची मुदत दिलेल्या मुदतीत भरत नाही तेव्हा उशीरा पेमेंट शुल्क आकारले जाते. अशा स्थितीत क्रेडिट कार्ड कंपन्या ग्राहकाने केलेल्या प्रत्येक उशिरा पेमेंटवर प्रचंड व्याज आकारतात. त्यामुळे वेळेत पेमेंट करा. 

3/5
ओव्हरसीज ट्रान्झॅक्शन चार्ज (Overseas transaction charge)
ओव्हरसीज ट्रान्झॅक्शन चार्ज (Overseas transaction charge)

क्रेडिट कार्ड जारी करण्यापूर्वी सर्व बँका ग्राहकांना फक्त फायदे सांगतात. कार्डच्या साह्याने तुम्ही परदेशात व्यवहार करू शकता, असे बँकर्स सांगतात. पण ते किती आकारणार हे सांगता येत नाही. क्रेडीट कार्डने परदेशात व्यवहार करत असाल तर त्यासाठी तुम्हाला शुल्क भरावे लागेल.

4/5
अधिभार लक्षात ठेवा (Surcharge)
अधिभार लक्षात ठेवा (Surcharge)

सर्व बँका क्रेडिट कार्डने पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी अधिभार आकारतात. अनेकदा हे शुल्क रिफंड मिळते. पण रिफंडसाठी एक निश्चित मर्यादा असेत आणि त्यापेक्षा जास्त इंधन कुणी भरल्यास त्याला शुल्क परत मिळत नाही.   

5/5
रोख पैसे काढण्याचे शुल्क (Charges on Cash Withdrawal)
रोख पैसे काढण्याचे शुल्क (Charges on Cash Withdrawal)

गरजेच्या वेळी काही लोक क्रेडिट कार्डमधून पैसे काढतात, असे अनेकदा दिसून येते. पैसे काढल्याबरोबर बँक शुल्क आकारण्यास सुरुवात करते हे फार कमी लोकांना माहीत आहे. कार्डवर शॉपिंगची सुविधा मिळते. पण जर तुम्ही रोख रक्कम काढली तर त्या बदल्यात तुम्हाला चार्ज भरावी लागेल. 





Read More