Champions Trophy 2024 : खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन भारतीय संघ पाकिस्तानमध्ये खेळणार नाही, असं बीसीसीआयने स्पष्टपणे पीसीबीला सांगितलं आहे. अशातच युनूस खानने (Younis khan on Virat Kohli) मोठं वक्तव्य केलंय.
मला असं वाटतं की, विराट कोहलीने पाकिस्तानमध्ये नक्की येयला हवं. क्रिकेटचा चाहता म्हणून आमची तशी इच्छा आहे, असं युनूस खानने म्हटलं आहे.
विराट कोहलीने आपल्या कारकीर्दीत अनेक रेकॉर्ड रचलेत. मात्र, विराट कधी पाकिस्तानमध्ये खेळला नाही, असंही युनूस खान म्हणाला.
विराट कोहलीच्या कारकिर्दीत राहिलेली ही एकच गोष्ट आहे. जी त्याने पूर्ण करावी, अशी इच्छा युनूस खानने व्यक्त केली आहे.
आयसीसी बैठकीत बीसीसीआयच्या विनंतीनुसार भारताचे सामने श्रीलंकेत किंवा यूएईत खेळवण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नाराज आहे.
दरम्यान, युनूस खान हा पाकिस्तानचा यशस्वी कॅप्टन आहे. 2009 मध्ये युनूस खानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला होता.