YouTube Earning:सध्याच्या काळात ऑनलाइन कमाईची व्याप्ती खूप वाढली आहे. आजच्या काळात, असे बरेच लोक आहेत जे ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे चांगली कमाई करत आहेत. सध्या युट्यूब शॉर्ट्स हे ऑनलाइन कमाईचे मुख्य साधन बनले आहे. यातून पैसे मिळवण्यासाठी काही निकष पूर्ण करावे लागतात.
YouTube shorts Earning Money: अनेकजणांचे युट्यूबवर अकाऊंट असते पण त्यातून पैसे कसे मिळवायचे? हे बहुतांश जणांना माहिती नसते. पण काही क्रायटेरिया पूर्ण केलात तर युट्यूबमधून पैसे मिळवणे खूप सोपे आहे.
सध्या लोक युट्यूब शॉर्ट्सच्या माध्यमातून चांगली कमाई करत आहेत. युट्यूब शॉर्ट्स हा ऑनलाइन कमाई करण्याचा उत्तम मार्ग आहे. तुम्ही पुढे देण्यात आलेले निकष पूर्ण करताच चांगली रक्कम तुमच्या बॅंक खात्यात येऊ शकते.
युट्यूब शॉर्ट्समधून कमाई करण्यासाठी या टीप्स तुम्हाला उपयुक्त ठरतील. त्यांच्याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहे. पण पुढे देण्यात आलेल्या टिप्सचे काळजीपूर्वक पालन केल्यासच हे शक्य आहे.
सर्व प्रथम क्रियेटरला 1 हजार फॉलोअर्स पूर्ण करावे लागतील. असे केल्यास पहिला निकष पूर्ण कराल.
मागच्या 90 दिवसांत तुमच्या चॅनेलवर 10 मिलियन व्ह्यूज असणे बंधनकारक आहे.
शॉर्ट्समधून कमाई करण्यासाठी, मागील 12 महिन्यांमध्ये 4000 तास वॉच टाईम पूर्ण करणे आवश्यक आहे.
या काळात क्रियेटरला त्याच्या चॅनेलवर कोणत्याही प्रकारची बनावट किंवा AI जनरेट केलेला कंटेंट पब्लिश होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.
युट्यूब शॉर्ट्सवरून पैसे कमवण्याचे अनेक मुख्य मार्ग आहेत. यात रील्समध्ये दिसणाऱ्या जाहिरातींद्वारे सर्वोत्तम कमाई केली जाते.
जाहिराती आणि रिवॉर्ड्स मिळवून क्रिएटर्स चांगली कमाई करू शकतात.याशिवाय प्रोडक्टची जाहिरात करूनही कमाई करता येते.
रील बनवण्यासाठी सर्वोत्तम विषय निवडणे महत्वाचे आहे. तुम्ही टेक टिप्स आणि ट्रिक्सवर व्हिडीओ करु शकला. फायनान्स आणि बिझनेसवर तसेच फॅक्ट्स क्लिपवर व्हिडीओ बनवून जास्त व्ह्यूज मिळवू शकता.