Stuart Broad vs Yuvraj Singh: अशातच आता स्टुअर्ट ब्रॉड निवृत्त होत असल्याचं कळताच युवीने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित ब्रॉडीला शुभेच्छा दिल्या आहेत.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने निवृत्तीची घोषणा केली आहे. 600 हून अधिक विकेट घेणारा ब्रॉडी आता अॅशेस मालिकेत खेळताना दिसणार नाही.
सिक्सर किंग युवराज सिंह याने 2007 साली टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये स्टुअर्ट ब्रॉड याला एकाच ओव्हरमध्ये सहा सिक्स खेचले होते. स्टुअर्ट ब्रॉडसाठी हा सर्वांत वाईट दिवस होता.
अशातच आता स्टुअर्ट ब्रॉड निवृत्त होत असल्याचं कळताच युवीने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित ब्रॉडीला शुभेच्छा दिल्या आहेत.
विश्वसनीय कसोटी कारकीर्दीबद्दल अभिनंदन.. तुझा प्रवास आणि जिद्द खूप प्रेरणादायी आहे. ब्रॉडीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असं कॅप्शन युवराज सिंह याने दिलंय.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस मालिकेतील अखेरचा सामना ओव्हल मैदानात सुरु आहे. या सामन्यात ब्रॉडीला गार्ड ऑफ ऑनर दिला गेला.