PHOTOS

4.75 कोटीच नव्हे; धनश्रीसोबत पंगा घेऊन चहलचं 'इतकं' नुकसान; ऐकून बसेल धक्का!

लग्न करुन फक्त 18 महिने एकत्र घालवल्यानंतर चहल मोठी किंमत मोजावी लागली. पण या पलिकडे जाऊनही चहले खूप मोठं नुकसान झालंय.

Advertisement
1/8
4.75 कोटीच नव्हे; धनश्रीसोबत पंगा घेऊन चहलचं 'इतकं' नुकसान; ऐकून बसेल धक्का!
4.75 कोटीच नव्हे; धनश्रीसोबत पंगा घेऊन चहलचं 'इतकं' नुकसान; ऐकून बसेल धक्का!

Yuzvendra Chahal Career: गेल्या काही दिवसांपासून युजवेंद्र चहल सतत चर्चेत आहे. धनश्री वर्मापासून घटस्फोट घेण्यासाठी त्याला 4.75 कोटी रुपये इतकी मोठी रक्कम मोजावी लागली. दोघांनीही परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. लग्न करुन फक्त 18 महिने एकत्र घालवल्याबद्दल चहल मोठी किंमत मोजावी लागली. पण या पलिकडे जाऊनही चहले खूप मोठं नुकसान झालंय.

2/8
आकडेवारी
आकडेवारी

पुरुषांसाठी कायदा किती चांगला आहे की वाईट यावर चर्चा करता येईल. पण 4.75 कोटी रुपयांच्या खर्चाने अयशस्वी विवाहातून मुक्त होणे हा चहलसाठी फायदेशीर करार आहे की तोटा? हा मोठा प्रश्न आहे. जर आपण आकडेवारी पाहिली तर असे दिसते की हे चहलसाठी हे वरदान आहे. यामागची कारणे समजून घेऊया.

3/8
करारातून युजवेंद्र चहलला वगळले
 करारातून युजवेंद्र चहलला वगळले

गेल्या वर्षीच बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून युजवेंद्र चहलला वगळले. चहलने 2020 मध्ये धनश्री वर्माशी लग्न केले आणि 2022 पासून दोघेही वेगळे राहत होते. वैयक्तिक आयुष्यातील ताणतणावाचा फटका चहलला आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतही सहन करावा लागला. त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द घसरत चालल्याचं दिसतंय.

4/8
एकमेव मार्ग
एकमेव मार्ग

भारतीय संघात परतण्याचा त्याच्याकडे एकमेव मार्ग उरला आहे तो म्हणजे आयपीएल. चहलकडे त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील गोंधळातून पूर्णपणे बाहेर पडण्याची आणि त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करण्याची चांगली संधी आहे. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करुन तो बीसीसीआयचे लक्ष पुन्हा वेधून घेऊ शकतो.

5/8
चहल हळूहळू फॉर्ममध्ये परतोय
चहल हळूहळू फॉर्ममध्ये परतोय

जर आपण आकडेवारी पाहिली तर युजवेंद्र चहल हा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स (205 विकेट्स) घेणारा गोलंदाज आहे. आयपीएल 2024 मध्ये युजवेंद्र चहलला 15 सामन्यांमध्ये फक्त 18 विकेट घेता आल्या. 2023 च्या हंगामात चहलने 14 सामन्यांमध्ये 21 विकेट्स घेतल्या. या हंगामात त्याची गोलंदाजी चांगली होती. आयपीएल 2022 मध्ये धनश्रीपासून वेगळे होण्यापूर्वी आयपीएल हंगामात चहलने 17 सामन्यांमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि 27 विकेट्स घेतल्या.

6/8
18 कोटींची क्षमता सिद्ध करावी लागेल
18 कोटींची क्षमता सिद्ध करावी लागेल

चहल सध्याच्या आयपीएल हंगामात पंजाब किंग्जकडून खेळतोय. पंजाबने 18 कोटी रुपये खर्च करून युझीला आपल्या संघात घेतलंय. आता चहलवर पुन्हा एकदा आपली क्षमता सिद्ध करण्याची जबाबदारी आहे. पुन्हा एकदा जुन्या फॉर्ममध्ये परतून त्याला टीम इंडियामध्ये आपले स्थान निर्माण करावं लागेल. धनश्री वर्मापासून घटस्फोटानंतर घेतल्यानंतर चहलला आता वैयक्तिक आयुष्यात पुढे जाऊन कोणत्याही किंमतीत चमकदार कामगिरी करावी लागेल.

7/8
काउंटी क्रिकेटमध्ये उत्तम फॉर्म
काउंटी क्रिकेटमध्ये उत्तम फॉर्म

गेल्यावर्षी इंग्लंडमधील काउंटी क्रिकेट दरम्यान चहल त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये दिसला. त्याने या हंगामात नॉटिंगहॅमशायरसाठी 4 सामने खेळले आणि 21.10 च्या सरासरीने 19 विकेट्स घेत उत्कृष्ट कामगिरी केली. तिथे त्याने 50 षटकांचे सामने खेळले आणि 5 विकेट्स घेतल्या. त्यामुळे चहल फॉर्ममध्ये असल्याचे दिसतंय.

8/8
हार्दिक, शमीनेही गमावली होती लय
हार्दिक, शमीनेही गमावली होती लय

पत्नीशी झालेल्या वादात युजवेंद्र चहलने आपली लय गमावली. पण क्रिकेटर्सच्या बाबतीत झालेली ही पहिलीच घटना नाही. याआधी मोहम्मद शमी आणि हार्दिक पंड्या हे देखील या टप्प्यातून गेले आहेत. पत्नीसोबतच्या वादानंतर शमी त्याच्या सततच्या खराब कामगिरीमुळे चर्चेत होता. त्यांना टीम इंडियाकडून पाठिंबा देण्यात आला. त्याच धर्तीवर पत्नीसोबतच्या वाद आणि घटस्फोटानंतर हार्दिक पंड्याचा आयपीएल हंगाम वाईट गेला. पण पांड्या वेळेत त्याच्या फॉर्ममध्ये परतला.





Read More