धनश्री वर्मा डॉक्टर आहे. पण सोबतच ती कोरियोग्राफर आणि यूट्यूबर देखील आहे. धनश्री तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नवीन नवीन व्हिडिओ शेअर करत असते.
धनश्रीच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सची संख्या लाखोंमध्ये आहे. धनश्रीच्या डान्स व्हिडिओला लाखो व्हिव्स आहेत. तिची स्वतःची एक डान्स अकॅडमी आहे. या शिवाय धनश्री टिकटॉकवरही चर्चेत होती.
कोरियोग्राफर, यूट्यूबर तसेच डेंटिस्ट आहे धनश्री वर्मा. डीवाय पाटील डेंटल कॉलेजमधून तिने पदवी संपादन केली.
धनश्री आणि युजवेंद्र हे बर्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते, पण दोघांनीही कधीही त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केला नाही.
धनश्री आणि युजवेंद्र पहिल्यांदाच जगासमोर आले आहेत. लवकरच धनश्री एका स्टार क्रिकेटरची पत्नी होणार आहे, त्यामुळे तिची फॅन फॉलोव्हिंग अधिक वाढणार आहे.