नवं प्रोजेक्ट असो किंवा अगदी खासगी जीवनातील एखादी आनंदाची, आव्हानाची किंवा महत्त्वाची गोष्ट असो. याच सोशल मीडियावर सध्या एका अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत आहेत.
हा फोटो पाहून तुमच्या काही लक्षात येतंय का? हा चेहरा ओळखीचा वाटतोय का? फोटोमध्ये दिसणारी ही अभिनेत्री कोणी साधीसुधी महिला नसून, ती राजघराण्याची सदस्य आणि भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडूची पत्नीसुद्धा आहे.
ही अभिनेत्री आहे सागरिका घाटगे. कागलशी थेट संबंध असणाऱ्या विजयंस घाटगे यांची ही लेक. तर, झहीर खान या क्रिकेटपटूची ही पत्नी. याव्यतिरिक्तही सागरिकाची आणखी एक ओळख म्हणजे एक अभिनेत्री, एक उद्योजिका.
सागरिकानं नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. कायमच पतीसोबतची एखादी सहल किंवा एखाद्या तत्सम क्षणाचा फोटो शेअर करणाऱ्या सागरिकानं यावेळी तिच्या कामाविषयीची माहिती चाहत्यांना दिली आहे.
'ललाट' नावाच्या आगामी चित्रपटातून सागरिका झळकणार असून, याच चित्रपटाच्या शूटिंग लोकेशनवरील फोटो तिनं शेअर केले आहेत. रुपेरी पडद्यापासून बराच काळ दूर राहिल्यानंतर पुनरागमनाचा हा काळ आव्हानात्मक असल्याचं तिनं इन्स्टा पोस्टमध्ये म्हटलं.
आपल्याला जे आवडतं ते करण्यासाठी या जगतात परतणं हे कधीच सोपं नव्हतं असं म्हणताना तिनं मिळालेल्या संधीसाठी कृतज्ञता व्यक्त केली.
आपली भूमिका नेमकी किती वेगळी आहे आणि हे पात्र साकारण्यासाठी नेमकी कशी मेहनत घेतली जात आहे याचीही माहिती तिनं चाहत्यांना दिली.
कलाविश्वात एका नव्या संधीसह प्रेक्षकांची मनं जिंकू पाहणाऱ्या सागरिकाचा हा लूक तुम्हाला कसा वाटला? (सर्व छायाचित्र- सागरिका घाटगे/ इन्स्टाग्राम)