Zakir Hussain Net Worth : प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसैन यांनी जगाचा निरोप घेतला आणि कलाविश्वास एकच हळहळ व्यक्त करण्यात येतं आहे. ते एका कॉन्सर्टसाठी 5 ते 10 लाख रुपये घ्यायचे. पण त्यांना ते '5 रुपये' होते खूप अनमोल होते. काय आहे यामागील कहाणी जाणून घेऊयात.
15 डिसेंबर 2024 हा दिवस भारतीय संगीतासाठी वाईट ठरला. कारण प्रसिद्ध तबला वादक उस्ताद झाकीर हुसैन यांचं निधन झालं वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी सॅन फ्रान्सिस्को इथे अखेरचा श्वास घेतला.
झाकीर हुसैन यांच्या नावावर 5 ग्रॅमी अवॉर्ड असून त्यांनी 12 चित्रपटांमध्ये काम केले आहे. हुसेन यांना 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आलंय.
झाकीर हुसैन यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी मुंबईत तबला वादक अल्ला राखा खान यांच्या घरी झाला. झाकीरजींना त्यांच्या वडिलांकडून तबला वाजवण्याचा वारसा मिळाला आहे. त्यांनी घरी सराव केला आणि अभ्यासही सुरू ठेवला.
झाकीर हुसैन यांनी मुंबईतील सेंट झेविअरमधून पदवी प्राप्त केली आहे. सुरुवातीच्या काळात त्यांच्या वडिलांनी त्यांना संगीत शिकवले पण नंतर झाकीर हुसेन यांनी पंडित शिवकुमार यांच्याकडून संगीत शिकले. झाकीर हुसैन अनेकदा इन्स्टाग्रामवर त्यांची आठवण करून देणारे फोटो शेअर करत असतो.
रिपोर्ट्सनुसार, झाकीर हुसैन 12 वर्षांचा असताना ते आपल्या वडिलांसोबत एका कॉन्सर्टला गेला होता. पंडित रविशंकर, उस्ताद अली अकबर खान, बिस्मिल्ला खान, पंडित शांता प्रसाद आणि पंडित किशन महाराज या संगीत दिग्गजांनी त्या मैफलीला हजेरी लावली होती.
हे सर्व दिग्गज मंचावर होते आणि अल्लाह राखा खानसोबत 12 वर्षांचा झाकीर हेदीखील मंचावर गेले होते. त्यादरम्यान स्टेजवरील परफॉर्मन्स संपल्यानंतर झाकीर यांना 5 रुपये मिळाले. रिपोर्ट्सनुसार झाकीर हुसैन यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, 'त्यानंतर मी खूप पैसे कमावले पण ते 5 रुपये माझ्यासाठी खूप मौल्यवान आहेत.'
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो सुमारे 10 लाख डॉलर्स म्हणजेच 9 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक होता. हुसेन त्याच्या एका कॉन्सर्टसाठी 5 ते 10 लाख रुपये घेत असे. झाकीर हुसैन यांनी वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी अमेरिकेत पहिला कॉन्सर्ट केला होता.
झाकीर हुसेनने 1978 मध्ये इटालियन तरुणी अँटोनिया मिनेकोलाशी लग्न केलं. अँटोनिया त्यांची मॅनेजर होती. एकत्र काम करत असताना दोघेही खूप जवळ आले. त्यांना इसाबेला कुरेशी आणि अनिशा कुरेशी या दोन मुली आहेत. 1997 मध्ये झाकीर हुसैन शबाना आझमीसोबत साज चित्रपटात दिसले होते. यामध्ये त्यांनी तबलावादक म्हणून काम तर केलेच पण अभिनयही केला.