Maharashtra Marathwada students cannot read and write Marathi : केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, मात्र राज्यातल्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा वाचताच येत नाही, हे वास्तव समोर आलंय. मराठवाड्यातल्या 8 पैकी 6 जिल्ह्यांमधल्या जिल्हा परिषद शाळांच्या 29 टक्के विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही, अशी धक्कादायक बाब समोर आलीय. विभागीय आयुक्त प्रशासनानं पाहणी केली. यात विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नसल्याचं समोर आलंय. पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान पाहणी केली. त्यात इंग्रजी, गणित विषयांमध्येही विद्यार्थी कच्चे आहेत, असं या निष्कर्षात आढळून आलं आहे. हा अहवाल खुद्द शिक्षकांनीच दिलाय. लातूर आणि बीडचे निष्कर्ष अद्याप यायचेत. मात्र उर्वरित मराठवाड्यातले हे निष्कर्ष धक्कादायक आहे.
या अहवालानुसार 33.73 टक्के पहिलीतील विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही, असं समोर आलंय.
तर 1 लाख 16 हजार 741 पहिलीतील विद्यार्थी 5 शब्द असलेले लहान वाक्य वाचतात, असं या अहवालात सांगण्यात आलंय.
शिक्षकांच्या अहवालानुसार 39 हजार 371 पहिलीतील विद्यार्थ्यांना लहान वाक्य वाचता येत नाही, असंही अहवालात नमूद करण्यात आलंय.
अहवालानुसार 30.59 टक्के दुसरीतील विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही.
37 हजार 891 दुसरीतील विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही.
दुसरीतील 1 लाख 23 हजार 861 विद्यार्थ्यांना मोठं वाक्य वाचता येतं.
तिसरीतील विद्यार्थ्यांचा रिपोर्टनुसार 28.28 टक्के विद्यार्थ्यांना मराठी वाक्य वाचता येत नाही.
तिसरीतील विद्यार्थ्यांचा रिपोर्टनुसार 37 हजार 439 विद्यार्थ्यांना मराठी वाचता येईना.
तिसरीत शिकणाऱ्या 1 लाख 32 हजार 385 विद्यार्थांना मोठं वाक्य वाचता येतं.
अहवालानुसार पहिलीतील विद्यार्थी गणितात तर दुसरीचे वजाबाकीत कच्चे असल्याच समोर आलंय.
39 टक्के पहिलीतील विद्यार्थ्यांना साधी बेरीज करता आली नाही.
37 टक्के दुसरीच्या विद्यार्थ्यांना वजाबाकी करता आली नाही.
33 टक्के तिसरीच्या विद्यार्थ्यांना गुणाकार करता आला नाही.
काही विद्यार्थ्यांना अंक ओळखही करता आली नाही.
33 टक्के पहिलीच्या विद्यार्थ्यांना A,B,C,D ओळखता आली नाही.
43 टक्के दुसरीच्या विद्याथ्यर्थ्यांना कॅपिटल आणि स्मॉल लेटर्समधील फरक सांगता आला नाही.
24 टक्के तिसरीतील विद्यार्थ्यांना 10 पर्यंत अंक मोजता आले नाहीत.