Marathi News> पुणे
Advertisement

पुणे हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये! पोलिसांना दिल्या 'या' सूचना

Pune Porsche Accident: आतापर्यंत काय घडलंय? अशा घडना घडू नयेत म्हणून काय करायला हवे? यावर चर्चा केल्याचे ते म्हणाले. 

पुणे हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये! पोलिसांना दिल्या 'या' सूचना

Pune Porsche Accident: पुण्यातील पोर्शे अपघातावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर घडलेल्या प्रकारावर जनतेमध्ये संताप आणि नाराजी आहे. आतापर्यंत काय घडलंय? अशा घडना घडू नयेत म्हणून काय करायला हवे? यावर चर्चा केल्याचे ते म्हणाले. पुणे पोलीस मुख्यालयातून ते बोलत होते. 

आरोपीवर आयपीसी 304 कलम लावण्यात आले आहे. हा मुलगा 17 वर्षे 8 महिन्याचा आहे. 16 वर्षावरील मुलांना सज्ञान म्हटले जाऊ शकते. पोलिसांनी गाडीचे, वयाचे सबळ पुरावे दिले होते. अशावेळी त्याला सुनावलेली शिक्षा अतिशय आश्चर्यकारक आहे. नागरिकांच्या मनात शासनाबद्दल शंका निर्माण करणारी होती. यानंतर तात्काळ वरच्या कोर्टात दाद मागण्यात आली. 

पोलिसांनी हे प्रकरण अत्यंत गंभीरतेने घेतले आहे. कारवाई सुरु असून त्यात निश्चित न्याय मिळेल, असे ते म्हणाले. नवीन लायसन्स देताना त्याचे नियम काटेकोर असावेत. स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊ नये, याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. 

ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह विरोधातील कारवाई तीव्र करणार आहोत. पोलीस याबाबत कठोर कारवाई करतील. बारमध्ये जाणाऱ्या मुलांचे डॉक्युमेंट तपासले जाणार आहेत. बाहेर सीसीटीव्ही लावले जातील, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नाकाबंदी करुन असे प्रकार टाळले जातील, असे फडणवीसांनी यावेळी सांगितले. 

बापलेकीचं 'ते' संभाषण ठरलं शेवटचं, अश्विनीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर वडिलांनी सांगितली आठवण

Read More