Marathi News> पुणे
Advertisement

पुण्यातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर! रुग्णांसाठी ICU बेड शिल्लकच नाही

ण्यातील आरोग्यव्यवस्थेवर इतका ताण आलाय की, शहरात आज एकही आयसीयु बेड शिल्लक नाही. 

पुण्यातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर! रुग्णांसाठी ICU बेड शिल्लकच नाही

पुणे : राज्यात कोरोना बेफान गतीने वाढत आहे. मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये कोरोनाचे थैमान सुरू आहे. कोरोनामुळे आजारी पडणाऱ्यांची हजारोंची संख्या प्रशासनाची चिंता वाढवत आहे.  त्यातच पुण्यातील आरोग्यव्यवस्थेवर इतका ताण आलाय की, शहरात आज एकही आयसीयु बेड शिल्लक नाही. त्यामुळे बेड्सच्या कमतरतेची गंभीर परिस्थिती शहरात असल्याचे दिस आहे.

 पुण्यात दररोज हजारोंच्या संख्येने कोरोना रुग्णांची नोंद आहे. अनेकांना कोरोनाच्या त्रासाने ऑक्सिजन व्हेंटिलेटर, आयसीयुची गरज भासते. परंतु कोरोना रुग्णांची बेफाम वाढ पाहता. शहरात ऑक्सिजनचे फक्त 47 तर, ऑक्सिजन  विरहित 733 बेड शिल्लक आहेत.
 
 सर्वात धक्कादायक म्हणजे आज पुण्यात एकही आय़सीयु बेड शिल्लक नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत गंभीर रुग्णांनी काय करायचे? हा प्रश्न त्यांच्या नातेवाईकांना पडला आहे.

 पुण्यात रेमडिसिव्हिर इंजेक्शनचाही तुटवडा सध्या जाणवतोय. परंतु तत्काळ हे इंजेक्शन रुग्णांना उपलब्ध व्हावे. या दृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहे. 
 

Read More