Marathi News> पुणे
Advertisement

पुण्यात अशी झाली शिवसेना मनसेची युती

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात 'एकला चलो रे'ची भूमिका घेतली. मात्र, पुण्यात मनसेने शिवसेनेसोबत युती केलीय. ही युती झालीय...         

पुण्यात अशी झाली शिवसेना मनसेची युती

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'एकला चलो रे'ची भूमिका घेतली आहे. मध्यतंरी कधी शिवसेनेसोबत तर कधी भाजपसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना युती करण्याच्या चर्चा जोरात सुरु होत्या. पण अखेरीस त्या अफवाच ठरल्या.

मात्र, पुण्यात मनसेने शिवसेनेसोबत युती केलीय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापनदिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात मनसैनिकांना मार्गदर्शन केले होते. यावेळच्या भाषणात त्यांनी अनेक नेत्यांची खिल्लीही उडविली होती.   

याचदरम्यान राज ठाकरे यांनी या दौऱ्यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी पेठ येथे कार्यालयाचं उद्घाटन केलं होतं. त्यावेळी त्यांनी अनेक पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटीही घेतल्या होत्या.

याच नवी पेठेतल्या मनसे कार्यालयाच्या बाजूलाच शिवसेनेनेही आपलं कार्यालय सुरु केलंय. त्यामुळे नवी पेठ येथे शिवसेना आणि मनसेच्या झालेल्या या युतीची पुण्यात जोरदार चर्चा सुरु आहे.

शिवसेनेचे पदाधिकारी प्रसाद काकडे यांनी हे कार्यालय सुरु केलं आहे. पुण्यात आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या या संपर्क कार्यालयात शिवसैनिकांची वर्दळ वाढत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी संपर्क कार्यालये सुरु करण्यावर भर देण्यात येत आहे. मात्र, नवी पेठेतील सेने मनसेची शेजारी असणारी ही कार्यालये पुण्यात चर्चचा विषय ठरली आहे. 

fallbacks

Read More