Marathi News> पुणे
Advertisement

पुण्यात मंदिराच्या बांधकामादरम्यान स्लॅब कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू

जखमी मजुरांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

पुण्यात मंदिराच्या बांधकामादरम्यान स्लॅब कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू

पुणे: पुण्यात बुधवारी एका मंदिराच्या बांधकामादरम्यान स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दोन मजुरांचा मृत्यू झाल्याचे समजते. प्राथमिक माहितीनुसार, पुण्याच्या पिंपळे-गुरव परिसरात या मंदिराचे बांधकाम सुरु होते. त्यावेळी अचानकपणे मंदिराच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. यामध्ये चार मजूर गंभीररित्या जखमी झाले. त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान यापैकी दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याचे समजते. 

बुधवारी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास मंदिराचा सभा मंडप दगडी खांबासह खाली कोसळला यावेळी तिथे तीन पुरुष आणि एक महिला असे चार मजूर काम करत होते. पारंपारिक पद्धतीने या मंदिराचे काम सुरु होते. त्यासाठी एकावर एक खांबाचा भाग रचून वर चढवला जात होता. हे काम सुरु असतानाच स्लॅबचा भाग अचानकपणे कोसळला. स्लॅब कोसळल्यानंतर चार मजूर त्याखाली अडकले.

Read More