Marathi News> रिलेशनशीप
Advertisement

तुमच्या पार्टनरला अधिक रोमँटिक करतील या टिप्स

असं म्हणतात ही प्रेम हे नेहमी तरुण राहिले पाहिजे. नात्यात तोचतोचपणा आला की कंटाळवाणे होते. त्यासाठी नात्यात नवे काहीतरी हवे. 

तुमच्या पार्टनरला अधिक रोमँटिक करतील या टिप्स

मुंबई : असं म्हणतात ही प्रेम हे नेहमी तरुण राहिले पाहिजे. नात्यात तोचतोचपणा आला की कंटाळवाणे होते. त्यासाठी नात्यात नवे काहीतरी हवे. सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपल्याल्या नात्याकडे लक्ष द्यायलाही पुरेसा वेळ नाही. यामुळे नात्यात सुरुवातीला जी एक्ससाईटमेंट ती कमी कमी होत जाते. मात्र तुम्ही चिंता करु नका. आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देत आहोत ज्यामुळे तुमचे प्रेम नेहमी चिरतरुण राहील. 

सकाळी उठल्यावर आपल्या जोडीदारा नुसतेच गुड मॉर्निंग म्हणू नका तर यासोबतच जोडीदाराच्या गालावर वा कपाळावर किस करुन त्याला गुड मॉर्निंग म्हणा. यामुळे आपल्या जोडीदाराला छान वाटेल. दररोज हे रुटीन सुरु केल्यास हळू हळू तुमचा जोडीदार तुमच्याकडे अधिक आकर्षित होईल.

तुमचे उडणारे केसही तुमच्या पार्टनरला अधिक रोमँटिक करु शकतात. सकाळी सकाळी जेव्हा तुम्ही फ्रेश होऊन पार्टनरसमोर जाल तेव्हा तुमचा जोडीदार स्वत:ला रोखू शकणार नाही. 

सुगंध जोडीदाराला तुमच्याकडे अधिक आकर्षित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावतो. त्यामुळे चांगला सुगंध असलेला परफ्यूम वापरा. 

याशिवाय जोडीदाराला स्पेशल फील करण्यासाठी त्याच्या लहान लहान गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही तुमच्याकडे अधिक आकर्षित करु शकता.

Read More