Marathi News> भविष्य
Advertisement

2025 ची सुरुवात 3 राशींच्या लोकांसाठी नकारात्मक! शनि-सूर्यमुळे कोसळणार आर्थिक संकट

Surya Shani Yuti 2025 : नवीन वर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. अशात येणारं नवीन वर्ष कसं असेल हे जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक असतात. अशात 3 राशींच्या लोकांसाठी 2025 ची सुरुवात नुकसानदायक ठरणार आहे, असं भाकीत करण्यात आलंय. 

2025 ची सुरुवात 3 राशींच्या लोकांसाठी नकारात्मक! शनि-सूर्यमुळे कोसळणार आर्थिक संकट

Sun-Saturn Conjunction in 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रह एका ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलतात. ग्रहांच्या या स्थिती बदलाला ग्रह गोचर असं म्हणतात. ग्रहांची स्थितीचा परिणाम हा सर्वांना होतो. काहींसाठी हा सकारात्मक तर काहींसाठी नकारात्मक ठरतो. नवीन वर्षात ग्रहांचा राजा सूर्य आणि न्यायदेवता शनिदेव आपली स्थिती बदलणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात आली स्थिती बदलतो. तर शनिदेव सध्या स्वगृही कुंभ राशीत विराजमान आहे. सूर्य ग्रह नवीन वर्षात 12 फेब्रुवारी 2025 ला कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत कुंभ राशीत शनि - सूर्यची युती अशुभ मानले जात आहे. खरं तर कुंभ राशीत पिता पुत्राची ही भेट काही राशींसाठी नकारात्मक ठरणार आहे. 

पिता पुत्राची भेट काही राशींसाठी नुकसानदायक!

मिथुन रास 

नवीन वर्षातील शनी सूर्यची युती या राशीच्या लोकांसाठी अशुभ ठरणार आहे. हा काळा त्यांच्यासाठी कठीण असणार आहे. महिनाभर तुम्हाला शत्रूंपासून सावध राहावं लागणार आहे. मनातील गोष्टी इतरांना सांगू नका. तुम्हाला सूर्य शनि युतीमुळे आर्थिक संकट कोसळणार आहे. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. या काळात कुठलेही गुंतवणूक करु नका. कामाच्या ठिकाणाही उगाच वादात अडकू नका. रागावर नियंत्रण ठेवणे तुमच्या हिताच ठरले. 

कन्या रास 

फेब्रुवारी महिन्यातील सूर्य शनिची युती तुमच्यासाठी कठीण असणार आहे. अनेक अडचणीचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. तिच्या बोलण्यावरही या काळात नियंत्रण ठेवा. त्याशिवाय तुमच्यावर सोपवण्यात आलेल्या काम वेळीत आणि निष्ठेने पूर्ण करा. वाहन चालवताना काळजी घ्या. या काळात कुटुंबातील कोणतेही वाद घालू नका. 

 

हेसुद्धा वाचा - Baba Vanga Predictions 2025 : 'या' 5 राशी नवीन वर्ष 2025 मध्ये होणार गडगंज श्रीमंत; बाबा वेंगाचं भविष्यवाणी

 

तूळ रास 

पिता पुत्राची ही युती या राशीच्या लोकांसाठी घातक ठरणार आहे. या काळात प्रेमसंबंधात दुरावा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबातील वरिष्ठाची प्रकृती अचानक बिघडणार आहे. त्यासोबत आयुष्यात अडचणी वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी निष्काळजीपणा करु नका. अन्यथा वरिष्ठांच्या रोषाचा सामना करावा लागेल. अनावश्यक खर्च वाढणार असून तुम्ही तणावात असणार आहे. या काळात कुठल्याही निर्णय घाईने न घेता काळजीपूर्वक घ्या 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read More