Marathi News> भविष्य
Advertisement

१७ मे नंतर मीन राशीतील मंगळाचे भ्रमण उजळविणार ‘या’ तीन राशींचे भाग्य

१७ मे रोजी मंगळ ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. हे संक्रमण ३ राशींसाठी अतिशय उत्तम परिणाम देणारे ठरणार आहे.    

१७ मे नंतर मीन राशीतील मंगळाचे भ्रमण उजळविणार ‘या’ तीन राशींचे भाग्य

मुंबई : मंगळ हा धैर्य, दृढनिश्चयाचा ग्रह मानला जातो. मेष आणि वृश्चिक राशीचा शासक असा हा मंगळ ग्रह आहे. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत या ग्रहाची स्थिती मजबूत असते त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आणि उर्जेची कमतरता नसते.

१७ मे रोजी मंगळ ग्रह मीन आणि गुरु राशीत प्रवेश करणार आहे. हे संक्रमण ३ राशींसाठी उत्तम ठरणार आहे. या राशीच्या लोकांचे नशीब उघडण्याची दाट शक्यता आहे.

वृषभ : आर्थिकदृष्ट्या हा काळ फायदेशीर ठरेल. उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये सकारात्मक परिणाम दिसेल. नवीन मित्र तुम्‍हाला करिअरमध्‍ये पुढे जाण्‍यासाठी खूप साथ देतील. परदेश प्रवासाची संधी मिळू शकते.

तूळ : तुम्ही पैशाची बचत करू शकाल. स्वतःचा व्यवसाय करत असाल तर हा कालावधी फायदेशीर ठरू शकतो. भागीदारीच्या कामात लाभ होईल. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ अनुकूल आहे. जुन्या कर्जातून मुक्त होऊ शकता.

मकर : करिअरच्या संदर्भात परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. आर्थिकदृष्ट्या काळ अनुकूल राहील. बचत करण्यात यशस्वी व्हाल. उत्पन्नाचा प्रवाह चांगला राहील. सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या लोकांसाठी ही वेळ अनुकूल आहे.

Read More