Marathi News> भविष्य
Advertisement

अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी का करावं? यंदा सोनं खरेदीचा शुभ मुहूर्त काय? जाणून घ्या


Akshay Tritiya 2025: हिंदू धर्मात सोनं आणि दागिने हे लक्ष्मीचं भौतिक रुप मानलं गेलं आहे. पण या दिवशी सोनं का खरेदी केलं जातं जाणून घेऊया.   

अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी का करावं? यंदा सोनं खरेदीचा शुभ मुहूर्त काय? जाणून घ्या

Akshay Tritiya 2025: अक्षय्य तृतीया हा हिंदू धर्मानुसार शुभ दिवस मानला जातो. या दिवशी सोनं खरेदी करणं शुभं मानलं जातं. पण गेल्या काहि दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सोनं सर्वसामान्याच्या अवाक्याबाहेर गेलं आहे. अक्षय्य तृतीया अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तोपर्यंत सोनं स्वस्त होऊ शकते का, सवाल ग्राहक करत आहेत. पण अक्षय्यतृतीयेला सोनं खरेदी करण्याची परंपरा का निर्माण झाली? हे जाणून घेऊया. 

यंदा अक्षय्य तृतीया बुधवारी 30 एप्रिल रोजी आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. पंचागानुसार यंदा अक्षय्यतृतीयेला सर्वार्थ सिद्धी योग असून देवी लक्ष्मीची पूजा केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. त्याचबरोबर या योगावर सोन्याचे दागिने खरेदी केल्यास अक्षय्य वृद्धी होते, असं मानण्यात येते. 

अक्षय्य तृतीयेच्या अर्थ शुभ मुहूर्त आहे. याचा अर्थ या दिवशी कोणतेही काम मुहूर्त न पाहता करता येते. अक्षय्य तृतीयेचा दिवस शुभ व मंगल कार्यासाठी शुभ असतो. या दिवशी लग्न, मुंज, गृह प्रवेश यासारखे कार्य कोणताही मुहूर्त न पाहता करता येऊ शकतात. म्हणूनच या दिवशी लोक नवीन कामाची सुरुवात करतात.  

सोनं खरेदी करण्याचा शुभं मुहूर्त?

यंदा अक्षय्य तृतीयेला अनेक शुभ संयोग घडत आहेत. या दिवशी सोनं खरेदी करण्यासाठी सर्वार्थ सिद्धी योग बनतोय. संपूर्ण दिवस हा योग असणार आहे. त्याव्यतिरिक्त शोभन योग दुपारी 12 वाजून 02 मिनिटांपर्यंत आहे. रवि योग संध्याकाळी 4 वाजून 18 मिनिटांनी सुरू होऊन संपूर्ण रात्रभर असणार आहे. 

सोनं खरेदी करण्यासाठी सकाळी 5 वाजून 41 मिनिट  ते दुपारी 2 वाजून 12 मिनिटांपर्यंतचा वेळ शुभ असणार आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करण्याचा वेळ सकाळी 5 वाजून 41 मिनिट ते दुपारी 12 वाजून 18 मिनिटांपर्यंतचा वेळ शुभ आहे. 

पंचागानुसार, 29 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजून 31 मिनिटांनी सुरू होऊन 30 एप्रिल 2025 ला दुपारी 2 वाजून 12 मिनिटांनी संपणार आहे. तिथीनुसार, 30 एप्रिलला पूजा आणि खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त आहे. 

सोनं का खरेदी करावं?

सोनं हे देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं. यामुळं सोनं खरेदी केल्यास आपण साक्षांत लक्ष्मीच घरी आणतोय, अशी मान्यता आहे. यामागे एक पौराणिक कथादेखील आहे, देव आणि दानवांच्या समुद्रमंथनादरम्यानही सोने बाहेर आले होते. जे भगवान विष्णूंनी परिधान केले होते. या कारणास्तव यामुळे सोने माता लक्ष्मीनारायणाचं रूप मानलं जातं. याच कारणामुळे अक्षय्य तृतीया आणि धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. त्यामुळे, जर आपण अक्षय्य तृतीयेला सोने किंवा सोन्याचे दागिने विकत घेऊन घरी आणतो, तेव्हा त्यासोबत देवी लक्ष्मीही आपल्या घरात प्रवेश करते, असं मानलं जातं. 

आणखी एका पौराणिक मान्यतेनुसार, अक्षय्य तृत्तीयेच्या दिवशी महाभारताचे युद्ध संपले होते. तसंच, याच दिवशी विष्णुंनी भगवान परशुरामाचा अवतार घेतला होता. तसंच,भगवान विष्णूंनीही याच दिवशी नर नारायणाचा अवतार घेतला होता. या शुभ तिथीपासूनच श्रीगणेशाने महाभारताचे काव्य लिहिण्यास सुरुवात केली होती. यामुळेच या दिवसाला विशेष महत्त्व आहे.

Read More