Marathi News> भविष्य
Advertisement

Shani Dev: अक्षय्य तृतीयेपूर्वी 'या' 3 राशींसाठी शनिदेवाचा कहर, आयुष्यात संकटाचं वादळ? तर यांच्यासाठी ठरणार भाग्यशाली

Shani Dev : शनी ग्रहाचा नक्षत्र बदल झाल्यामुळे  काही राशीच्या लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. अक्षय्य तृतीयेपूर्वी काही राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण कठीण राहणार आहे. 

Shani Dev: अक्षय्य तृतीयेपूर्वी 'या' 3 राशींसाठी शनिदेवाचा कहर, आयुष्यात संकटाचं वादळ? तर यांच्यासाठी ठरणार भाग्यशाली

Shani Dev: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा मानवी जीवनावर परिणाम पडत असतो. नऊ ग्रहांचा मानवी जीवनातील यश, प्रगती, लग्न आणि नोकरी इत्यादीवर होत असतो. या ग्रहांच्या स्थितीमुळे राशींवर सकारात्मक आणि नकारत्मक परिणाम होत असता. शनिदेव हा क्रूर आणि न्यायदेवता मानला जातो. शनिदेव मानवाला त्याचा कर्माची शिक्षा देत असतो. शनिदेव सर्वात संथ गतीने आपली स्थिती बदलत असतो. पंचांगानुसार सोमवारी 28 एप्रिलला सकाळी 7.52 वाजता उत्तरभाद्रपद भ्रमण करत आहे. त्यामुळे शनिदेवाचे नक्षत्र गोचर 12 राशींपैकी तीन राशींसाठी धोकादायक तर तीन राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. 

 

'या' 3 राशींसाठी शनिदेवाचा कहर

कर्क

या राशीच्या लोकांनी शनिदेवाचा कहर पाहिला मिळणार असून यांनी सावध राहवे लागणार आहे. या काळात कर्क राशीचे लोक फसवणुकीचे बळी पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. कुटुंब आणि नातेवाईकांमध्ये मतभेद होण्याचे संकेत आहेत. कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रस्तावावर किंवा कागदपत्रांवर तपासून सुरु आणि विचारपूर्वकच त्यावर सही करा. तसंच भांडवली गुंतवणूक आणि कर्ज घेऊ नका. याशिवाय आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. 

सिंह

या राशीच्या लोकांना काही नुकसान सोसावे लागणार आहे. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामात काही अडथळे येण्याची दाट शक्यता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी काही वाद होतील. जर तुम्ही भांडवल गुंतवण्याचा विचार करत असाल तर सध्या त्यापासून दूर राहणे तुमच्या हिताचे ठरणार आहे. मुलांशी संबंधित गोष्टींमध्ये तणावाचा सामना करावा लागणार आहे. 

वृश्चिक

या राशीच्या लोकांसाठी शनिदेव डोकेदुखी ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी बॉससोबत वाद होतील. याशिवाय काही आरोग्याच्या समस्याही वाढणार आहे. अशा प्रकरणांमध्ये अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. या काळात तुमच्या कुटुंबात संघर्ष आणि तणावाची परिस्थिती निर्माण होणार आहे. तुम्हाला मानसिकदृष्ट्या एकटेपणा जाणवणार आहे. ज्यामुळे चिडचिड आणि राग वाढणार आहे. कार्यालयीन राजकारणापासून दूर राहा. विचारपूर्वक काम करा.

यांच्यासाठी शनिदेव ठरणार भाग्यशाली

वृषभ 

या राशीच्या लोकांसाठी, शनिदेव शुभ ठरणार आहे. तुमचा आत्मविश्वास वाढणार असून हा काळ चांगला असणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळणार आहे. व्यावसायिकांच्या व्यवसायात वाढ दिसून येणार आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळेल. परस्पर मतभेद दूर होणार आहे. उत्पन्नात वाढ होणार आहे. 

कुंभ

या राशीच्या लोकांसाठी शनिदेव खूप शुभ राहणार आहे. अद्याप पूर्ण न झालेली अनेक कामे लवकरच पूर्ण होणार आहे. बिघडलेली कामेही मार्गी लागणार आहे. मन अधिक प्रसन्न राहणार आहे. नोकरदारांसाठी हा काळ चांगला असणार आहे. संपत्तीत वाढ होणार असून तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. नात्यात गोडवा राहणार आहे. तुम्ही नवीन काम करण्याचा विचार करणार आहात. व्यवसायात नफा मिळणार आहे. बाहेर जाण्याचे बेत आखणार आहात. 

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी शनीदेव खूप शुभ राहणार आहे. वैवाहिक जीवनात गोडवा वाढणार आहे. प्रलंबित कामे पूर्ण होणार आहे. आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहणार आहे. व्यवसायात यश प्राप्त होणार आहे. नोकरदारांसाठी हा काळ चांगला राहणार आहे. तुम्हाला प्रगतीच्या संधी प्राप्ता होणार आहे. कर्जातून मुक्तता मिळणार असून संपत्तीत वाढ होण्याचे संकेत आहेत. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read More