Marathi News> भविष्य
Advertisement

'या' बोटात घाला चांदीची अंगठी! मिळेल पैसाच पैसा

Silver Ring Benefits : तुम्हालाही चांदीची अंगठी घालायला आवडते? मग जाणून घ्या कोणत्या बोटात परिधान केल्यानं मिळेल पैसाच पैसा

'या' बोटात घाला चांदीची अंगठी! मिळेल पैसाच पैसा

Silver Ring Benefits : आपल्या भारतीय संस्कृतीत चांदी खूप शुभ मानली जाते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांच्या दागिन्यांमध्ये, पायातील पैंजण, बिचवा, अंगठ्या चांदीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. पण फक्त सौंदर्यासाठी नाही, तर आरोग्य, मनाच्या शांतीसाठी आणि सौख्यासाठीही चांदी ही उपयोगी ठरते.

शरीरासाठी चांदीचे फायदे

ज्योतिषशास्त्रानुसार चांदी हे शुक्र आणि चंद्र या ग्रहांशी संबंधित धातू आहे. हे धातू जलतत्त्वाशी जोडलेलं असतं, त्यामुळे चांदीचे दागिने घातल्यास शरीरातील जलतत्त्व संतुलित राहते. याचा परिणाम आपल्या आरोग्यावर सकारात्मक होतो. तर शरीर थंड राहतं, तणाव कमी होतो आणि मन शांत राहतं.

चांदीची अंगठी कुठल्या बोटात घालावी?

चांदीची अंगठी नेहमी उजव्या हाताच्या करंगळीमध्ये घालावी. जर विधीवत पद्धतीनं ही अंगठी परिधान केली, तर चंद्र आणि शुक्र ग्रहांचा शुभ प्रभाव असतो. यामुळे राग अनावर होणाऱ्या व्यक्तीलाही शांतता अनुभवायला मिळते. मन अधिक स्थिर राहतं आणि स्वतःवर नियंत्रण ठेवता येतं.

चांदीची अंगठी घातल्याचे फायदे

ज्या लोकांना असं वाटतं की स्वतःचं व्यक्तिमत्त्व उठून दिसावं, मान-सन्मान वाढावा असं वाटतं तर त्यांनी चांदीची अंगठी किंवा छोटं चांदीचा छल्ला घालावा. यामुळे चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते, त्वचेचे डागही कमी होतात. सौंदर्य वाढतं आणि आत्मविश्वासही वाढतो. 

महालक्ष्मीची कृपा कायम राहावी यासाठी

जर तुम्हाला वाटत असेल की घरात लक्ष्मीमातेचं नित्यसंचार असावा, तर एकतर उजव्या हाताच्या करंगळीमध्ये चांदीची अंगठी सतत घाला किंवा घराच्या तिजोरीत एक छोटा चांदीचा तुकडा किंवा कॉइन ठेवा. असं केल्याने घरात धन, समृद्धी आणि शांती टिकून राहते. 

हेही वाचा : Good News : वयाच्या 35 व्या वर्षी आई होणार पत्रलेखा; लग्नाच्या 4 वर्षांनंतर बाप होणार राजकुमार राव

दरम्यान, त्यामुळे फक्त महिलांनीच नाही तर पुरुषांनी देखील चांदीचे दागिणे हे परिधान करायला पाहिजे. कारण चांदीचे दागिणे परिधान केल्यानं आपल्या आरोग्याला वेगवेगळे फायदे होतात. त्यामुळे यापुढे जर दागिणे परिधान करण्याची इच्छा झाली तर चांदीचे दागिणे परिधान करण्यास पसंती द्या. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read More