Marathi News> भविष्य
Advertisement

Numerology: 'या' तरुणी 9 मूलांकासाठी ठरतात सर्वोत्तम जोडीदार; कठीण काळात देतात नवऱ्याची साथ

अंकशास्त्रात, जन्मतारखेला विशेष महत्त्व असून जन्मतारखेवरुन त्यांचा स्वभाव, त्यांचा भविष्य अगदी त्यांचा होणाऱ्या जोडीदाराबद्दलही सांगितलं जातं. जर तुमच्या जन्म 9, 18 आणि 27 तारखेला झाला असेल तर या लोकांसाठी कोणत्या जन्मतारखेच्या तरुणी सर्वोत्तम जोडीदार असतात पाहूयात.     

Numerology: 'या' तरुणी 9 मूलांकासाठी ठरतात सर्वोत्तम जोडीदार; कठीण काळात देतात नवऱ्याची साथ

Numerology : अंकशास्त्रात जन्मतारखेला विशेष महत्त्व दिले जाते. तुमच्या जन्मतारखेनुसार अंकशास्त्रात तुमचा स्वभाव, भविष्य अगदी तुमच्या आयुष्याबद्दल सांगितलं जातं. अंकशास्त्रात 1 ते 9 हे मूलांक मानले जाते. ज्या कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित असतात. संबंधित ग्रह त्या संख्येच्या लोकांवर देखील परिणाम करतो. ज्यावरून आपण त्यांच्या स्वभावाबद्दल, करिअरबद्दल आणि प्रेम जीवनाबद्दल सांगितलं जातं. तुमच्या जन्मतारखेच्या संख्या जोडून तुम्ही तुमचा मूलांक शोधू शकता. उदाहरणार्थ, जर तुमचा जन्म महिन्याच्या 15 तारखेला झाला असेल, तर तुमचा मूळ क्रमांक 1+5=6 असेल. याचा अर्थ त्यांच्या मूलांक 6 असतो. आज आपण 9 मूलांक असलेल्या लोकांसाठी कोणत्या जन्मतारखेच्या तरुणी सर्वोत्तम जोडीदार असतात पाहूयात. 

अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेल्या लोकांचा अंक 9 मानला जातो. हा अंक मंगळाशी संबंधित असून अशा परिस्थितीत, मंगळाच्या प्रभावामुळे, या अंकाखाली जन्मलेल्या लोकांमध्ये ऊर्जा आणि धैर्यवान असतात पण ते खूप जास्त रागीट असतात.   

या जन्मतारखेच्या तरुणी असतात सर्वोत्तम जोडीदार!

अंकशास्त्रानुसार, ज्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला आहे. त्याचा मूलांक हा 3 असतो. या संख्येच्या लोकांवर बुध ग्रहाचा प्रभाव असतो, जो ज्ञान आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक मानले गेले आहेत. या अंकाच्या लोकांवर चंद्राचा प्रभाव दिसून येतो, ज्यामुळे ते भावनिक आणि शांत असतात. 9 अंकाच्या लोकांसोबत त्यांची चांगली जोडी बनते आणि परस्पर समन्वयामुळे या दोघांचेही आयुष्य चांगले व्यतित होतं. 

ही जोडी पण असते बेस्ट!

मूलांक 6 असलेले लोक अशा लोकांमध्ये समाविष्ट आहेत जे मूलांक 9 असलेल्या लोकांसाठी सर्वोत्तम जोडीदार मानले गेले आहेत. 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 6 असतो. या मूलांकाचा स्वामी ग्रह शुक्र आहे. जो प्रेम, सौंदर्य आणि शांतीचे प्रतीक आहे. त्यामुळे मूलांक 9 आणि मूलांक 6 हे एकमेकांसाठी बनले आहे, अशी भावना त्यांच्या आयुष्यात असते. त्यांचा संसार कोणाची दुष्ट लागेल असा असतो. यासोबतच, मूलांक 9 असलेले लोक त्यांच्या स्वतःच्या मूलांक म्हणजेच 9 असलेल्या लोकांशी चांगले वागतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.) 

Read More